Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिवादन


नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2026

राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.

परकीय सत्तेविरुद्धच्या लढ्यात राणी लक्ष्मीबाई यांनी दाखवलेले अदम्य धैर्य आणि असामान्य शौर्य यांची गाथा देशातील प्रत्येक पिढीला मातृभूमीसाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे :

“भारत मातेच्या पराक्रमी कन्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः नमन. त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही आपल्या कर्तव्याशी आणि स्वाभिमानाशी कधीही तडजोड केली नाही. परकीय सत्तेविरुद्धच्या लढ्यात त्यांनी दाखवलेले अदम्य धैर्य आणि असामान्य शौर्य यांची गाथा देशातील प्रत्येक पिढीला मातृभूमीसाठी आपले सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा देत राहील.”

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai