
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे व्यावसायिक खाणकामांसाठी 41 कोळसा खाणींची लिलाव प्रक्रिया सुरू केली. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत, केंद्र सरकारने केलेल्या घोषणांच्या मालिकेतील हा एक भाग होता. कोळसा मंत्रालयाने फिक्कीच्या सहकार्याने या कोळसा खाणींच्या लिलावासाठी प्रक्रिया सुरू केली. कोळसा खाणींच्या वाटपासाठी दोन टप्प्यांची इलेक्ट्रॉनिक लिलाव प्रक्रिया अवलंबली जात आहे.
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत कोविड -19 महामारीवर मात करेल आणि या संकटाचे देश संधीत रूपांतर करेल. ते म्हणाले की या संकटाने भारताला आत्मनिर्भर अर्थात स्वयंपूर्ण व्हायला शिकवले आहे. आत्मानिर्भर भारत म्हणजे आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि आयातीवरील परकीय चलनाची बचत करणे. याचाच अर्थ असा की भारत देशांतर्गत संसाधने विकसित करेल जेणेकरून देशाला आयातीवर अवलंबून राहावे लागणार नाही. तसेच आपण आता ज्या वस्तू आयात करतो त्या वस्तूंचा सर्वात मोठा निर्यातदार बनणे असा याचा अर्थ आहे.
पंतप्रधान म्हणाले की हे साध्य करण्यासाठी प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक उत्पादन प्रत्येक सेवा ध्यानात ठेवून समग्र कार्य केले पाहिजे, जेणेकरुन विशिष्ट क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण होईल. ते म्हणाले की, आज उचलले गेलेले एक मोठे पाऊल उर्जा क्षेत्रात भारताला स्वयंपूर्ण बनवेल. ते म्हणाले की, हा कार्यक्रम केवळ कोळसा खाण क्षेत्रातील सुधारणांच्या अंमलबजावणीसाठीच नव्हे तर तरुणांना लाखो रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची सुरुवात देखील आहे. आज आपण केवळ व्यावसायिक कोळसा खाण लिलाव सुरू करत नाही तर अनेक दशकांच्या लॉकडाऊनपासून कोळसा क्षेत्राला मुक्त करत आहोत.
जगातील चौथ्या क्रमांकाचा कोळसा साठा असलेला आणि दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा कोळसा उत्पादक असणारा भारत कोळसा आयात करणारा दुसरा सर्वात मोठा देशही आहे, या विसंगतीवर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की, ही परिस्थिती गेल्या अनेक दशकांपासून कायम होती. आणि कोळसा क्षेत्राला कॅप्टिव्ह आणि नॉन-कॅप्टिव्ह खाणींच्या जाळ्यात अडकवून ठेवले होते. या क्षेत्राला स्पर्धेतून वगळले गेले आणि पारदर्शकता ही एक मोठी समस्या होती. यामुळे कोळसा क्षेत्रात गुंतवणूकीचा अभाव होता आणि त्याची कार्यक्षमता देखील संशयास्पद होती. असे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधान पुढे म्हणाले की,2014 मध्ये कोळसा क्षेत्राला चालना देण्यासाठी कोळसा जोडणी सुरू केली गेली. वाढती स्पर्धा, भांडवल, सहभाग आणि तंत्रज्ञान यासाठी कोळसा आणि खाण क्षेत्र पूर्णपणे खुले करण्याचा भारताने मोठा निर्णय घेतला आहे. खासगी खाण क्षेत्रातील नवीन कंपन्यांना अर्थसहाय्याची अडचण येऊ नये याची काळजी घेण्यात आल्याचे ते म्हणाले. मजबूत खाण आणि खनिज क्षेत्राशिवाय आत्मनिर्भरता येणे शक्य नाही कारण हे दोन्ही आपल्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत असे ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, या सुधारणानंतर कोळसा उत्पादन आणि संपूर्ण कोळसा क्षेत्र स्वयंपूर्ण होईल. आता कोळशासाठी बाजारपेठ खुली झाली आहे, म्हणून कोणतेही क्षेत्र त्यांच्या गरजेनुसार कोळसा खरेदी करू शकेल. पंतप्रधान म्हणाले, या सुधारणांचा फायदा केवळ कोळसा क्षेत्रालाच होणार नाही तर स्टील, अॅल्युमिनियम, खते आणि सिमेंटसारख्या इतर क्षेत्रांनाही होईल. तसेच वीज निर्मिती वाढविण्यात याची मदत होईल.
पोलाद, बॉक्साइट आणि इतर खनिज पदार्थ कोळशाच्या साठाच्या अगदी जवळ असल्यामुळे खनिज क्षेत्रातील सुधारणांना कोळसा खाण सुधारणांमधून बळकटी मिळाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की, व्यावसायिक कोळसा उत्खननासाठी आज लिलावाची सुरुवात ही सर्व हितधारक उद्योगांसाठी समान लाभाची परिस्थिती आहे. राज्य सरकारांना अधिकाधिक महसूल मिळेल आणि देशातील मोठ्या लोकसंख्येला रोजगार मिळेल. त्याचा प्रत्येक क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होईल.
कोळशाच्या सुधारणांची अंमलबजावणी करताना पंतप्रधान म्हणाले की पर्यावरणाचे रक्षण करण्याची भारताची वचनबद्धता कमकुवत होणार नाही याकडे लक्ष देण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले, “कोळशापासून गॅस बनवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो आणि कोळसा गॅसिफिकेशनसारख्या उपायांनी पर्यावरणाचे रक्षण करता येईल. कोळसा गॅसचा वापर वाहतूक आणि स्वयंपाकासाठी केला जाईल तर युरिया आणि स्टील निर्मिती उद्योगांना चालना देतील.” पंतप्रधान म्हणाले की सन 2030 पर्यंत सरकारने सुमारे 100 दशलक्ष टन कोळशाचे गॅसिफिकेशन करण्याचे लक्ष्य ठेवले असून त्यासाठी चार प्रकल्प निवडण्यात आले असून सुमारे 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.
पंतप्रधान म्हणाले की कोळसा क्षेत्राच्या या सुधारणांमुळे आपला आदिवासी पट्टा, पूर्व आणि मध्य भारत, विकासाचे आधारस्तंभ बनतील. ते पुढे म्हणाले की, या भागांमधे महत्वाकांक्षी जिल्हे मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांना प्रगती व समृद्धीची अपेक्षित पातळी गाठता आलेली नाही. ते म्हणाले की, देशातील 16 महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये कोळशाचा मोठा साठा आहे परंतु या भागातील लोकांना याचा पुरेसा लाभ मिळालेला नाही. या ठिकाणांतील लोकांना रोजगारासाठी दूरवरील शहरांमध्ये स्थलांतर करावे लागते.
पंतप्रधान म्हणाले की व्यावसायिक खाणकामांच्या दिशेने उचलण्यात आलेली ही पावले पूर्व आणि मध्य भारतातील स्थानिकांना त्यांच्या घरांजवळ रोजगार उपलब्ध करून देण्यात लाभदायक ठरतील. ते म्हणाले की, कोळसा उत्खनन आणि वाहतुकीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारने 50 हजार कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.
पंतप्रधान म्हणाले की कोळसा क्षेत्रातील सुधारणा आणि गुंतवणूक आदिवासींचे जीवन सुकर करण्यात मोठी भूमिका बजावेल. कोळसा उत्पादनाद्वारे मिळणार्या अतिरिक्त महसुलाचा वापर प्रदेशातील सार्वजनिक कल्याणकारी योजनांसाठी केला जाईल. ते म्हणाले की, राज्यांना देखील जिल्हा खनिज निधीमधून मदत मिळेल, ज्यामधून आजूबाजूच्या परिसरातील अत्यावश्यक सुविधांच्या विकासासाठी त्यातील मोठा हिस्सा वापरला जाईल.
पंतप्रधान म्हणाले की हा लिलाव अशा वेळी होत आहे जेव्हा आर्थिक व्यवहार वेगाने पूर्ववत होत आहेत. वापर आणि मागणी कोविड-19 पूर्वीचा स्तर गाठत आहे. वीज-वापर, पेट्रोलियम पदार्थांची मागणी, ई वे बिले, टोल वसुली, रेल्वे माल वाहतुक, डिजिटल किरकोळ व्यवहार यासारखी क्षेत्रे मागणीची कोविडपूर्व पातळी झपाट्याने गाठत असल्याची माहिती त्यांनी दिली.
ते म्हणाले की ग्रामीण अर्थव्यवस्थेतही सुधारणा व्हायला सुरुवात झाली आहे. यावर्षी खरीप लागवडी खालील क्षेत्र आणि गहू खरेदी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. याचा अर्थ अधिक पैसे शेतकर्यांच्या खिशात गेले आहेत. हे सर्व निर्देशक सांगतात की भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेण्यास आणि पुढे सरसावण्यास तयार आहे.
पंतप्रधानांनी इच्छा व्यक्त केली की यापूर्वी भारत ज्याप्रमाणे मोठ्या संकटातून बाहेर आला होता तसाच या संकटातूनही बाहेर येईल. भारत आत्मनिर्भर बनू शकेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. भारताचे यश आणि विकास निश्चित आहे. ते म्हणाले कि काही आठवड्यांपूर्वी एन-95 मास्क, कोरोना टेस्टिंग किट, पीपीई आणि व्हेंटिलेटरची बहुतांश आयातीद्वारे पूर्ण होत होती, ती मागणी आता मेक इन इंडियाद्वारे पूर्ण केली जात आहे. लवकरच आपण वैद्यकीय उत्पादनांचे निर्यातदार होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपला विश्वास आणि मनोधैर्य कायम ठेवण्याची विनंती त्यांनी लोकांना केली जेणेकरुन आपण आत्मनिर्भर भारत निर्माण करू शकू.
B.Gokhale/S.Kane/D.Rane
देश और विदेश से इस इवेंट में हिस्सा ले रहे सभी साथियों का बहुत-बहुत स्वागत है।
— PMO India (@PMOIndia) June 18, 2020
इतने Challenging Time में इस तरह के इवेंट का होना, आप सभी का उसमें शामिल होना, अपने आप में एक बड़ा संदेश लिए हुए है: PM @narendramodi
भारत कोरोना से लड़ेगा भी और आगे भी बढ़ेगा।
— PMO India (@PMOIndia) June 18, 2020
भारत इस बड़ी आपदा को अवसर में बदलेगा।
कोरोना के इस संकट ने भारत को आत्मनिर्भर भारत- Self Reliant होने का सबक दिया है: PM @narendramodi
आत्मनिर्भर भारत यानि भारत Import पर अपनी निर्भरता कम करेगा।
— PMO India (@PMOIndia) June 18, 2020
आत्मनिर्भर भारत यानि भारत Import पर खर्च होने वाली लाखों करोड़ रुपए की विदेशी मुद्रा बचाएगा।
आत्मनिर्भर भारत यानि भारत को Import न करना पड़े, इसके लिए वो अपने ही देश में साधन और संसाधन विकसित करेगा: PM @narendramodi
आज Energy Sector में भारत को आत्मनिर्भर बनाने के लिए, Self Reliant बनाने के लिए एक बड़ा कदम उठाया जा रहा है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 18, 2020
महीने भर के भीतर ही, हर घोषणा, हर रिफॉर्म्स, चाहे वो Agriculture Sector में हो, चाहे MSMEs के सेक्टर में हो या फिर अब Coal और Mining के Sector में हो, तेज़ी से ज़मीन पर उतर रहे हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 18, 2020
ये दिखाता है कि भारत इस Crisis को Opportunity में बदलने के लिए कितना गंभीर है, कितना Committed है।
— PMO India (@PMOIndia) June 18, 2020
आज हम सिर्फ Commercial Coal Mining के लिए Auction ही Launch नहीं कर रहे हैं, बल्कि Coal Sector को दशकों के लॉकडाउन से भी बाहर निकाल रहे हैं: PM @narendramodi
जो देश Coal Reserve के हिसाब से दुनिया का चौथा सबसे बड़ा देश हो,
— PMO India (@PMOIndia) June 18, 2020
जो दुनिया का दूसरा सबसे बड़ा Producer हो,
वो देश Coal का Export नहीं करता बल्कि वो देश दुनिया का दूसरा सबसे बड़ा Coal Importer हैं: PM @narendramodi
हमारे यहां दशकों से यही स्थिति चल रही थी।
— PMO India (@PMOIndia) June 18, 2020
देश के Coal Sector को Captive और Non-captive के जाल में उलझाकर रखा गया था।
इसको Competition से बाहर रखा गया था, Transparency की एक बहुत बड़ी समस्या थी: PM @narendramodi
साल 2014 के बाद इस स्थिति को बदलने के लिए एक के बाद एक कई कदम उठाए गए।
— PMO India (@PMOIndia) June 18, 2020
जिस कोल लिंकेज की बात कोई सोच नहीं सकता था, वो हमने करके दिखाया।
ऐसे कदमों के कारण Coal Sector को मजबूती भी मिली: PM @narendramodi
अब भारत ने Coal और Mining के सेक्टर को competition के लिए, capital के लिए, Participation और Technology के लिए, पूरी तरह से खोलने का बहुत बड़ा फैसला लिया है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 18, 2020
एक मजबूत माइनिंग और मिनरल सेक्टर के बिना Self Reliance संभव नहीं है।
— PMO India (@PMOIndia) June 18, 2020
क्योंकि Minerals और Mining हमारी Economy के Important Pillars हैं।
इन रिफॉर्म्स के बाद अब Coal Production, पूरा Coal Sector भी एक प्रकार से आत्मनिर्भर हो पाएगा: PM @narendramodi
जब हम Coal Production बढ़ाते हैं तो Power Generation बढ़ने के साथ ही Steel, Aluminum, फर्टिलाइजर, सीमेंट जैसे तमाम दूसरे सेक्टर्स में Production और Processing पर भी Positive Impact होता है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 18, 2020
Commercial Coal Mining के लिए आज जो ये Auction की शुरुआत हो रही है वो हर Stakeholders के लिए Win-win Situation है।
— PMO India (@PMOIndia) June 18, 2020
इंडस्ट्रीज को, आपको, अपने बिजनेस, अपने investment के लिए अब नए Resources मिलेंगे, नया मार्केट मिलेगा: PM @narendramodi
Coal Reforms करते समय इस बात का भी ध्यान रखा गया है कि Environment की रक्षा का भारत का कमिटमेंट कहीं से भी कमजोर न पड़े।
— PMO India (@PMOIndia) June 18, 2020
Coal से Gas बनाने के लिए अब बेहतर और आधुनिक टेक्नॉलॉजी आ पाएगी, कोल गैसीफिकेशन जैसे कदमों से Environment की भी रक्षा होगी: PM @narendramodi
हमने लक्ष्य रखा है कि साल 2030 तक करीब 100 मिलियन टन Coal को Gasify किया जाए।
— PMO India (@PMOIndia) June 18, 2020
मुझे बताया गया है कि इसके लिए 4 प्रोजेक्ट्स की पहचान हो चुकी है और इन पर करीब-करीब 20 हज़ार करोड़ रुपए Invest किए जाएंगे: PM @narendramodi
Coal Sector से जुड़े ये रिफॉर्म्स Eastern और Central India को, हमारी Tribal Belt को, Development का Pillar बनाने का भी बहुत बड़ा ज़रिया है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 18, 2020
देश में 16 Aspirational Districts ऐसे हैं, जहां कोयले के बड़े-बड़े भंडार हैं। लेकिन इनका लाभ वहां के लोगों को उतना नहीं हुआ, जितना होना चाहिए था।
— PMO India (@PMOIndia) June 18, 2020
यहां से बड़ी संख्या में हमारे साथी दूर, बड़े शहरों में Employment के लिए Migration करते हैं: PM @narendramodi
कोयला निकालने से लेकर Transportation तक को बेहतर बनाने के लिए जो आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर तैयार किया जाएगा, उससे भी रोज़गार के अवसर बनेंगे, वहां रहने वालों को अधिक सुविधाएं मिलेंगी: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 18, 2020
कोल सेक्टर में हो रहे रीफॉर्म, इस सेक्टर में हो रहा निवेश, लोगों के जीवन को, विशेषकर हमारे गरीब और आदिवासी भाई-बहनों के जीवन को आसान बनाने में बहुत बड़ी भूमिका निभाएगा: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 18, 2020
ये Auction ऐसे समय में हो रहे हैं, जब भारत में Business Activity तेज़ी से नॉर्मल हो रही है।
— PMO India (@PMOIndia) June 18, 2020
Consumption और Demand बड़ी तेज़ी से pre-COVID level की तरफ आ रही है।
ऐसे में इस नई शुरुआत के लिए इससे बेहतर समय नहीं हो सकता: PM @narendramodi
ये जितने भी Indicators हैं, वो दिखा रहे हैं कि Indian Economy तेज़ी से Bounce Back करने के लिए तैयार हो गई है, आगे चल पड़ी है।
— PMO India (@PMOIndia) June 18, 2020
साथियों,
भारत बड़े से बड़े संकटों से बाहर निकला है, इससे भी निकलेगा: PM @narendramodi
भारत की Success, भारत की Growth निश्चित है।
— PMO India (@PMOIndia) June 18, 2020
हम आत्मनिर्भर बन सकते हैं।
आप याद करिए,
सिर्फ कुछ सप्ताह पहले तक हम N-95 मास्क, कोरोना की टेस्टिंग किट, Personal Protective Equipment- PPE, वेंटिलेटर, अपनी जरूरत का ज्यादातर हिस्सा हम बाहर से मंगाते थे: PM @narendramodi
आप अपना विश्वास, अपना हौसला बुलंद रखिए,
— PMO India (@PMOIndia) June 18, 2020
हम ये कर सकते हैं।
हम आत्मनिर्भर भारत बन सकते हैं।
हम आत्मनिर्भर भारत बना सकते हैं।
Self Reliant India की जो Journey 130 करोड़ भारतीयों ने शुरु की है, उसमें आप सभी उसके बहुत बड़े भागीदार हैं: PM @narendramodi