पीएम्इंडिया
झुलू देशाचे महामहिम राजे ,
राजे गुडविल वेलीथिनिकभेकुझूलू ,
क्वाझुलू नाताल प्रांताचे माननीय प्रमुख,
इथेकवींनी महापालिकेचे महापौर,
सन्माननीय अतिथी, बंधू आणि भगिनींनो,
नमस्ते, वनक्कम
सानिबोनानी .
या सुंदर शहरात तुम्ही केलेल्या अप्रतिम स्वागताबद्दल खूप धन्यवाद. दक्षिण आफ्रिकेतील आजचा माझा दुसरा दिवस आहे. खरेच,क्वाझुलू नाताल मध्ये येऊन मला खूप आनंद झाला. ही झुलू योद्धांची भूमी आहे.ही अलबर्ट लुथुली याची भूमी आहे. हीच भूमी आहे जिथे ,गांधीजी महात्मा बनले.
अशी भूमी जिच्याबरोबर भारताने जोपासले आहेत;
-दृढ ऐतिहासिक संबंध
-दृढ सांस्कृतिक संबंध
-भरभराटीला येणाऱ्या आर्थिक घडामोडी
-दृढ क्रीडा संबंध
चैतन्यदायी वैविध्य या सुंदर देशाच्या उत्कृष्टतेच्या लक्षणांपैकी एक आहे.
डर्बन शहर आणि क्वाझुलू नाताल प्रान्ताखेरीज अन्य कोणत्याही शहरात यापेक्षा चांगले वैविध्य आढळणार नाही.
ही विविधता:
-बोली आणि भाषांची
-विविध विचारांमधील विश्वासाची, आणि
-सांस्कृतिक परंपरांची
या शहराच्या वारशाचा अविभाज्य भाग आहे.
एका बाजूला हिंद महासागर आणि दुसऱ्या बाजूला द्राकेन्सबर्ग पर्वतरांगा . निसर्ग देखील तुमच्या समृद्ध वैविध्यामध्ये हरखून गेला आहे. आणि, तुमच्या वैविध्याचे जतन करून तुम्ही मंडेला यांचे सप्तरंगी राष्ट्राचे स्वप्न जतन करण्यात आणि पुढे नेण्यात मदत करत आहात . तुमचा माझ्याप्रती स्नेह , डर्बन शहराने माझे केलेले भव्य स्वागत हे माझ्यासाठी विशेष आहे. तुम्ही केवळ माझा सन्मान केला नाहीत, तर माझ्या सव्वाशे कोटी देशबांधवांना देखील मान दिला आहेत. मी हे म्हणतोय कारण १८६० साली दक्षिण आफ्रिकेत याच ठिकाणी पहिल्यांदा भारतीय व्यक्तीने पाऊल ठेवले होते. १६ नोव्हेंबर १८६० रोजी ‘त्रुरो’ या जहाजातून ३४२ भारतीय नाताल बंदराच्या किनाऱ्यावर उतरले. माझ्या माहितीनुसार,त्या जहाजातून जे चारजण प्रथम उतरले, ते होते,दावरूम , त्याची पत्नी आणि दोन लहान मुली. आज दीड शतक उलटल्यानंतर , डर्बन हे भारताबाहेरचे सर्वात मोठे भारतीय शहर आहे. दक्षिण आफ्रिकेतील सर्वाधिक भारतीय वंशाच्या लोकांचे ते घर आहे. वर्णभेद आणि वसाहतवाद राजवटीमध्ये भारतीयांच्या सुरुवातीच्या पिढयांना जो छळ सहन करावा लागला , ते सर्वश्रुत आहे. परंतु, प्रतिकूल परिस्थितीतही , त्यांनी त्यांची संस्कृती आणि मूल्ये यांचे जतन केले.
आणि आज ते या देशाचे स्वाभिमानी,यशस्वी आणि निष्ठावंत नागरिक आहेत. ते त्यांच्या देशासाठी पुढील क्षेत्रात योगदान देत आहेत. :
-शिक्षण आणि वैज्ञानिक संशोधन
-नवउद्यमी आणि उद्योजक म्हणून
-वकील आणि न्यायाधीश म्हणून
-बँकर्स ,डॉक्टर्स आणि इंजिनिअर्स म्हणून
परंतु, ते फक्त त्यांच्यासाठी जगत नाहीयेत.
ते स्वतः आणि समाजातील संघटनांच्या मदतीने ,ते समाजातील गरीब आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी तसेच आजारी व वयोवृद्ध लोकांच्या सेवेसाठी प्रयत्न करत आहेत. वृद्धाश्रम , आजाराच्या अंतिम टप्प्यात असलेल्यांसाठी , एड्सग्रस्तांसाठी आणि कर्करोग रुग्णांसाठी केंद्रे व अनाथाश्रम यांसारखे उपक्रम ते चालवत आहेत. आपल्या लोकांच्या परस्पर संबंधांच्या इतिहासाने आपल्या आधुनिक काळातील भागीदारीसाठी मजबूत पाया रचला आहे. आज भारत आर्थिक संक्रमणातून वाटचाल करत आहे. आणि, दक्षिण आफ्रिका ही आफ्रिकेतील अग्रेसर अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. आपली व्यापार आणि गुंतवणूक भागीदारी लक्षणीय आहे.
काल , प्रिटोरिया येथे , सर्व सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये आपले धोरणात्मक संबंध अधिक वृद्धिंगत करण्यावर राष्ट्रपती झुमा आणि माझे एकमत झाले. यामध्ये पुढील बाबी समाविष्ट आहेत:-
-व्यापार आणि गुंतवणूक
-लघु आणि माध्यम उद्योगांचा विकास
माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान , आणि
-क्षमता आणि संस्था निर्मिती
यापैकी अनेक क्षेत्रात क्वाझूलू नाताल सामर्थ्यवान आहे आणि त्यामुळेच डर्बन बरोबरचे आमचे पारंपारिक संबंध अधिक मजबूत होतील. सुरक्षा आणि संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्रितपणे काम करायला आम्ही मान्यता दिली.
मित्रानो, दक्षिण आफ्रिकेत असतांना आणि ते देखील डर्बन मध्ये असूनही , जर मी क्रिकेटबद्दल बोललो नाही तर तो नोबॉल ठरेल. आपल्या समाजांमध्ये या खेळाप्रती आवड आणि प्रेम अपरंपार आहे. आणि, क्रिकेट हा आपल्या संबंधांचा एक महत्वाचा भाग राहिला आहे. इथल्या किंग्समेड मैदानात भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान अनेक संस्मरणीय सामने खेळले गेले आहेत.
मित्रानो,
शेवटी मी सांगू इच्छितो. आज, आपल्या या परस्परांवर अवलंबून असलेल्या जगात भारताची विकासगाथा हा तळपता तारा आहे. मात्र भारताची आर्थिक प्रगती ही केवळ आमच्या समाजाच्या कल्याणासाठी नाही. आमच्या भागीदारीची कवाडे संपूर्ण आफ्रिकेसाठी आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या आमच्या मित्रासाठी खुली आहेत. आज इथे येण्यापूर्वी मी फिनिक्सला भेट दिली. दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यादरम्यान , फिनिक्स हे गांधीजींचे घर होते. आपल्या दक्षिण आफ्रिकन बांधवांची काळजी सदैव गांधीजींच्या मनात असायची. एकविसाव्या शतकात , आपली आव्हाने बदलली असली तरी विकासाच्या समस्या समान आहेत. आपल्या विकास भागीदारीचा लाभ आपल्या समाजातील गरजू घटकांना , विशेषतः तरुणांपर्यंत पोहोचावा यासाठी माझे प्रयत्न असतील.
चला, एकमेकांचे भागीदार होऊया आणि आपल्या उज्वल भविष्याच्या मोठ्या संधींचा लाभ उठवूया. धन्यवाद,पुन्हा एकदा या स्वागताबद्दल आणि हा मान दिल्याबद्दल.
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद !
S. Kane/B.Gokhale
Thank you very much, for your wonderful welcome to this beautiful city: PM @narendramodi at the civic reception in Durban
— PMO India (@PMOIndia) July 9, 2016
One of the hallmarks of this beautiful nation is its vibrant diversity: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 9, 2016
Durban is the largest Indian city outside India. It is home to the largest population of people of Indian origin in SA: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 9, 2016
In our inter-dependent world India's growth story is one of the brightest spots: PM @narendramodi in Durban
— PMO India (@PMOIndia) July 9, 2016