Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अंकारातील बॉम्बस्फोट प्रकरणी पंतप्रधानांकडून दु:ख व्यक्त


तुर्कस्थानातल्या अंकारा येथे झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

अंकारातील बॉम्बस्फोटात झालेल्या जिवितहानीमुळे अपार दु:ख होत आहे. मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून, जखमी व्यक्तींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.