पीएम्इंडिया
पाच राज्यातल्या अनुसूचित जमातीच्या यादीत सुधारणा करण्यासाठी घटनादुरुस्ती संदर्भातली दोन विधेयकं संसदेत मांडायला केंद्रीय मंत्रिमंडळाने संमती दिली. आसाम, छत्तीसगड, झारखंड, तामिळनाडू, त्रिपुरा या पाच राज्यातल्या अनुसूचित जमातीतल्या यादीत सुधारणा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुद्दुचेरी या केंद्र शासित प्रदेशातल्या नव्या जमातीची दखलही घेण्यात येणार आहे.
आसाममधल्या बोरो, बोरो काचुरी, कार्बी, छत्तीसगडमधल्या भुनिया, भुईयान, भुयान, धनुवार, किसान, सौनरा, धनगड, झारखंडमधल्या भोगता, देशवारी, गांझू, दौतलबंदी, पतबंदी, राऊत, माझिया, खेरी, पुरम. तामिळनाडूमधल्या मलयाली, गोंडूर, नटीकोरवन, कुरीविक्कटन, त्रिपुरामधली दारलोंग आणि पुद्दुचेरीमधल्या इरुलर या जमातींचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्यासाठी पात्र ठरल्या आहेत.
या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर अनुसूचित जमातीत समावेश करण्यात आलेल्या जमातीच्या सदस्यांना अनुसूचित जमातीसाठीच्या सध्याच्या योजनांचे लाभ घेण्यासाठी पात्र ठरेल.
N. Chitale / B. Gokhale