Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आज झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला निषेध


नवी दिल्‍ली, 14 जुलै 2024

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे.

ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधात पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला  संदेश :

‘माझे मित्र आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मी चिंतेत आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. राजकारणात आणि लोकशाहीत हिंसेला कोणतेही स्थान नाही. ट्रम्प यांना लवकर बरे वाटावे, अशी मी कामना करतो. या हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या, जखमी झालेल्यांच्या आणि अमेरिकी नागरिकांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. 

@realDonaldTrump

* * *

S.Nilkanth/T.Pawar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai