Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अवकाळी पाऊस आणि वादळामुळे गुजरातमधे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दु:ख


गुजरातमधल्या विविध भागात अवकाळी पाऊस आणि वादळामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

अवकाळी पाऊस आणि वादळामुळे झालेल्या जीवितहानीमुळे दु:ख झाले. या पावसाचा फटका बसलेल्या बाधितांच्या मदतीसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून, परिस्थितीवर सरकारचे लक्ष आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

गुजरातच्या विविध भागात वादळ आणि अवकाळी पावसात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकाला, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची, तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात येईल.

M.Chopade/N.Chitale/D.Rane