पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात पुन्हा निवडून आल्याबद्दल न्यायमूर्ती दलवीर भंडारी यांचे अभिनंदन केले.
“न्यायमूर्ती दलवीर भंडारी आंतरराष्ट्रीय न्यायालयात पुन्हा निवडून आल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. ते पुन्हा निवडून येणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि राजनैतिक मिशनच्या संपूर्ण दलाने घेतलेल्या अथक प्रयत्नांबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताचे न्यायमूर्ती पुन्हा निवडून आले. भारताला दिलेल्या पाठिंब्यासाठी तसेच भारतावर ठेवलेल्या विश्वासासाठी यूएनजीए तसेच यूएनएससीच्या सर्व सभासदांचे आम्ही मनापासून आभारी आहोत”, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
Gopal/S.Mhatre/Anagha
I congratulate Justice Dalveer Bhandari on being re-elected to the International Court of Justice. His re-election is a proud moment for us.
— Narendra Modi (@narendramodi) November 21, 2017