Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधानांचा संदेश


आंतरराष्ट्रीय महिला दिनी मी महिलांच्या अंगी असलेले अतुलनीय धैर्य आणि अनेक क्षेत्रात त्यांनी केलेल्या असामान्य महिलांना आपल्या विकासाच्या प्रवासाचा एक समान आणि अविभाज्य घटक बनवण्याच्या आपल्या बांधिलकीचा आम्ही पुनरुच्चार करत आहोत. महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी माझ्या सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. भारताच्या प्रगतीसाठी आमच्या दृष्टीकोनाचा आणि देशातील नागरिकांना सन्मानाचे आयुष्य आणि समान संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचा हा केंद्रबिंदू आहे.

मुलींविषयी समाजात असलेल्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल घडवण्याचा आणि मुलींच्या शिक्षणावर भर देण्याचा बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा उद्देश आहे. सुकन्या समृद्धी योजनेमुळे तरुण महिलांच्या शिक्षणासाठी आणि विवाहासाठी पाठबळ उपलब्ध होईल. मुद्रा बँकेमुळे हजारो महिलांना आर्थिक स्वातंत्र्याचे लक्ष्य साध्य करता येणार. नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन बिमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या व्यापक सामाजिक सुरक्षा योजनांचा समावेश आहे. या योजनांमुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

महिलांवर होणाऱ्‍या अत्याचारांच्या घटना ऐकल्या की आपल्या माना शरमेने खाली जातात. महिलांबाबत केला जाणारा कोणत्याही प्रकारचा भेदभाव किंवा अन्याय दूर करण्यासाठी आपण खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे. ज्या महिलांना शोषणाला किवा हिंसाचारांना तोंड द्यावे लागते त्यांना कायद्याची मदत, मानसिक समुपदेशन आणि इतर मदत उपलब्ध करण्यासाठी एक खिडकी केंद्रे सरकारकडून उभारली जात आहेत. सरकार महिलांसाठी 181 या क्रमांकावर एक मोबाईल हेल्पलाईन सुरू करत असून या हेल्पलाईनवर महिलांना समुपदेशन व आपला दृष्टीकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी मी तुम्हा सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करत आहे.