Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आंध्र प्रदेशातील तिरुपती विमानतळावरील एकात्मिक प्रवासी विमानतळाच्या उद्‌घाटन समारंभातील पंतप्रधानांचे निवेदन

आज जगात सर्वाधिक वेगाने विकास झाला असेल, तर तो पर्यटन व्यवसायाचा. गरीबातील गरीब व्यक्तीला रोजगार मिळवून देण्याची ताकद पर्यटन व्यवसायात आहे. कमीत कमी निधीची गुंतवणूक करुन या क्षेत्रात कार्य करता येते. पर्यटनामुळे फळ विक्रेत्याची, फूल विक्रेत्याची, बिस्कीट विक्रेत्याची, चॉकलेट विक्रेत्याची कमाई होते आणि चहा विक्रेत्याचीही कमाई होते. पर्यटनामुळे गरीबातल्या गरीबाला रोजगाराची संधी मिळू शकते.

आपण जेव्हा जागतिक दर्जाच्या पायाभूत सोयी-सुविधा तयार करु, तेव्हाच पर्यटनाला चालना मिळेल. तिरुपतीमध्ये अनेक लोक येतात, बालाजीच्या दर्शनासाठी येतात, पण या विमानतळावरील विमान उड्डाणाची संख्या जितकी अधिक वाढेल, जितके अधिक प्रवासी येतील तेवढे पर्यटन वाढेल. त्यामुळे पायाभूत सोयी-सुविधा वाढवण्यावर भारत सरकाने जोर द्यायला हवा, ज्यामुळे पर्यटनासाठी सुविधा निर्माण होतील. आम्ही पर्यटनाला चालना देणाऱ्या “ई-व्हिसा” ची सोय केलीय, ज्यामुळे पर्यटनाला वेगाने चालना मिळत आहे.

अशी जी पर्यटन स्थळे आहेत, तिथे आम्ही वाय-फाय उपलब्ध करुन देत आहोत, ज्यामुळे परदेशातून आलेल्या व्यक्तींनाही सोय उपलब्ध होईल. तसेच खाजगी-सार्वजनिक भागीदारीतून हॉटेल निवास व्यवस्थेतही वाढ होईल. अशा अनेक मुद्दयांवर आम्ही एकत्रित वेळी काम करत आहोत. आज भगवान बालाजींची पवित्र भूमी असणाऱ्या आंध्र प्रदेशात अमरावती या राजधानीचे भूमिपूजन झाले. आणि त्याच वेळी मला ही संधीही मिळालीय. आणि गरुड, ज्याचा भगवान बालाजींबरोबर खूप दृढ संबंध आहे, त्या आकारातील ही रचना एक संस्मरणीय आठवण राहील. आपणा सर्वांना विजया दशमीच्या हार्दिक शुभकामना. तिरुपतीचा अधिक वेगाने विकास होवो.

J.Patnakar/S.Tupe