Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्ती प्रकारात पुरुषांच्या 57 किलो वजनीगटात ऐतिहासिक सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या अमन सहरावतचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात 57 किलोग्रॅम वजनीगटात भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमन सहरावतचे अभिनंदन केले आहे.

गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक पटकावण्यापासून ते यंदा थेट विजेतेपदाला गवसणी घालेपर्यंत अमन सहरावतने मोठी चिकाटी दाखवली आहे, असेही मोदी म्हणाले.

पंतप्रधान कार्यालयाने X वर म्हटले आहे: अमन सहरावतचा हा अतिशय दिमाखदार विजय आहे!

पुरुषांच्या 57 किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देत त्याने इतिहास रचला आहे. गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यापासून ते यावेळी सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचण्यापर्यंत, अमनने प्रचंड चिकाटी दाखवली आहे. त्याचे अभिनंदन आणि त्याला खूप खूप शुभेच्छा! : PM @narendramodi

***

शैलेश पाटील/प्रज्ञा जांभेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]