Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या निषाद कुमारचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या उंच उडीच्या टी47 प्रकारात आज नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकणाऱ्या निषाद कुमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन केले.

निषादची अष्टपैलू कामगिरी आणि उत्कृष्टतेचा ध्यास खरोखरच उल्लेखनीय असल्याचे नमूद करताना पंतप्रधानांनी सांगितले की, लांब उडीतल्या सुवर्णपदकानंतर उंच उडीमध्येही सुवर्णपदक जिंकून त्याने दोन सुवर्णपदकांसह संपूर्ण देशाची प्रशंसा मिळवली आहे. पंतप्रधानांनी त्याचे अभिनंदन करून आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वरील संदेशात म्हटले आहे,

“निषादची उत्कृष्ट क्रीडा कामगिरी!

पुरुषांच्या उंच उडीच्या टी47 प्रकारात नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकणाऱ्या प्रतिभावान निषाद कुमारचे अभिनंदन. यापूर्वीच लांब उडीमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याने आता दोन सुवर्णपदकांसह संपूर्ण देशाची प्रशंसा मिळवली आहे. त्याची अष्टपैलू कामगिरी आणि उत्कृष्टतेचा ध्यास खरोखरच उल्लेखनीय आहे. त्याचे अभिनंदन आणि आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.पंतप्रधान @narendramodi.”

***

Neha Kulkarni / Nilima Chitale / Madhura Nerurkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai