नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2026
आशियाई पॅरा स्पर्धेत महिला W1 तिरंदाजी प्रकारात पदार्पणातच रौप्यपदक जिंकून इतिहास घडवणाऱ्या स्वाती चौधरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. या प्रकारात भारताला मिळालेले हे पहिलेच पदक आहे.
ही अत्यंत विशेष कामगिरी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. स्वातीचा दृढनिश्चय खरोखरच कौतुकास्पद असल्याचे सांगत, तिने यापुढेही देशाचा गौरव वाढवत राहावा अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे,
“भारतीय पॅरा तिरंदाजीसाठी ही अत्यंत विशेष कामगिरी आहे!
स्वाती चौधरीने आशियाई पॅरा स्पर्धेत महिला W1 तिरंदाजी प्रकारात भारताला पहिलेवहिले पदक मिळवून देत इतिहास घडवला आहे. तिने पदार्पणातच रौप्यपदक पटकावले. तिचा दृढनिश्चय खरोखरच कौतुकास्पद आहे. तिने यापुढेही देशाचा गौरव वाढवत राहावे, हीच सदिच्छा. PM @narendramodi”
A very special achievement for Indian Para Archery!
Swati Chaudhary has created history by winning India’s first-ever medal in Women’s W1 Archery at the Asian Para Games, bringing home a Silver on her debut. Her determination is truly commendable. May she continue to make the nation proud: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 22, 2026
* * *
राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
A very special achievement for Indian Para Archery! Swati Chaudhary has created history by winning India's first-ever medal in Women's W1 Archery at the Asian Para Games, bringing home a Silver on her debut. Her determination is truly commendable. May she continue to make the nation proud: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 22, 2026