पीएम्इंडिया
ग्रामीण विकास क्षेत्रामध्ये क्षमता वृध्दिंगत कार्यक्रमासाठी भारत आणि अफ्रिकन आशिया ग्रामीण विकास संघटनेदरम्यानच्या सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.
वर्ष 2015-17 या त्रैवार्षिक कालावधीकरीता या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून या कराराअंतर्गत अफ्रिकन आशिया ग्रामीण विकास संघटनेच्या सदस्य देशांकरिता या त्रैवार्षिक कालावधीमध्ये भारतातील विविध उत्कृष्ट संस्थांमध्ये क्षमता वृध्दिंगत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या संस्थांमध्ये ग्रामीण विकास व पंचायती राज राष्ट्रीय संस्था, भारतीय व्यवस्थापन संस्था, भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारा संचालित होणाऱ्या संस्था आदींचा समावेश आहे.
B.Gokhale/S.Mhatre/V.Deokar