पीएम्इंडिया
आसाम मधे कामरूप इथे नवे एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था उभारायला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत हे एम्स उभारण्यात येणार असून, त्यासाठी 1123 कोटी रुपये खर्च येणार आहे.
48 महिन्यात हे एम्स पूर्ण करण्यात येईल. नवी दिल्लीतल्या एम्सच्या धर्तीवर उभारण्यात येणाऱ्या या एम्समध्ये 750 खाटा, 16 ऑपरेशन थेटर असतील. त्याचबरोबर ट्रामा केंद्र, वैद्यकीय महाविद्यालय, परिचारिका महाविद्यालय आणि याच्याशी संलग्न इतर सेवा असतील.
N.Sapre/N.Chitale/D.Rane