Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इंदूर विमानतळाला ‘नाशिवंत माल केंद्र’ उभारण्यासाठी मंजूरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत इंदूर विमानतळावर नाशिवंत मालासाठी केंद्र उभारण्याकरता भारतीय विमानतळ प्राधिकरणाची (ए ए आय) 1 हजार 500 चौरस मीटर जागा भाड्याने देण्यासाठी मान्यता देण्यात आली. ए ए आय मंडळाने केलेल्या ठरावानुसार ही मान्यता देण्यात आली.

नाशिवंत मालासाठी वाहतूक करणाऱ्या विमानतळांकरता या केंद्रात अत्याधुनिक निर्गमन व्यवस्था असेल. या केंद्रात एकाच छताखाली, व्यापाऱ्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याकरता आणि मालाचा दर्जा कायम राखण्याकरता जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध असतील. MPWLC खाजगी सार्वजनिक भागीदारी अंतर्गत ही सुविधा उभारणार आहे.

नाशिवंत मालासाठी उभारण्यात येणाऱ्या या केंद्रामुळे स्थानिक जनतेच्या रोजगाराच्या गरजा पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तसेच या केंद्रात मोठी रोजगार क्षमताही आहे. ह्या केंद्राच्या व्यवस्थापनासाठी एकूण 113 जणांची आवश्यकता आहे.

पार्श्वभूमी
राज्यातल्या माळवा भागातील औषधे, कुक्कुट उत्पादने आणि बागायती उत्पादने यांच्या निर्यातीसाठी असणारी मोठी मागणी लक्षात घेऊन मध्य प्रदेश सरकारने इंदूर विमानतळावर हे केंद्र उभारण्यासाठी अनुकूलता दर्शवली होती. या केंद्रामुळे मध्य प्रदेश सरकारला कृषी आणि बागायती क्षेत्राला चालना देता येईल.

J. Patankar /B. Gokhale