पीएम्इंडिया
भारत दौऱ्यावर असलेले इजिप्तचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सामेह हसन शौक्री यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारत इजिप्त द्विपक्षीय संयुक्त आयोगाच्या सातव्या बैठकीसाठी शौक्री भारतात आले आहेत.
इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष सीसी यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्याचं शौक्री यांनी या भेटीत पंतप्रधानांना सांगितले.
द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यासाठीच्या भारत आणि इजिप्तच्या कटिबध्दतेबाबत या दोन्ही नेत्यांनी यावेळी चर्चा केली.
पायाभूत सोयी सुविधा, व्यापार आणि गुंतवणूक या क्षेत्रात सहकार्य आधिक दृढ करण्यावरही यावेळी चर्चा झाली.
B.Gokhale/N.Chitale/Vaibhavi
Mr. Sameh Shoukry, Foreign Minister of the Arab Republic of Egypt met PM @narendramodi in Delhi. pic.twitter.com/zT0W5spv0B
— PMO India (@PMOIndia) March 23, 2018