Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उत्तर प्रदेशच्या इटाह अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पीएमएनआरएफ अंतर्गत 2 लाख रुपयांची मदत घोषित


उत्तर प्रदेशमधील इटाह येथे झालेल्या अपघातात मृत्यमुखी पडलेल्या व्यक्तींबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील इटाह जिल्ह्यातील अपघातात मृत्यमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच पंतप्रधानांनी, मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली. जे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यासाठी 50,000 रुपयांची मदत घोषित केली.

“उत्तर प्रदेशातील इटाह जिल्ह्यातील अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जे या अपघातात जखमी झाले त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी मी प्रार्थना करतो,” असे पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale/ P.Malandkar