पीएम्इंडिया
उत्तर प्रदेश राज्यस्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून, भारताच्या संस्कृती व वारशाच्या समृद्धीत त्यांच्या अमूल्य योगदानाचे त्यांनी कौतुक केले आहे. दुहेरी इंजिन सरकारच्या प्रभावी कार्यामुळे आणि विकासाभिमुख जनतेच्या सक्रिय सहभागामुळे, गेल्या नऊ वर्षांच्या कालावधीत उत्तर प्रदेशने ‘बिमारू’ राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवस्थेतून आदर्श राज्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. राज्याच्या भविष्यासंदर्भात विश्वास व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले की, उत्तर प्रदेशची अपार क्षमता देशाच्या प्रगतीला गतिमान व पुढे नेणारी ठरेल.
एक्स या सामाजिक माध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणाले की,
भारतीय संस्कृती आणि वारशाच्या समृद्धीत अमूल्य योगदान देणाऱ्या उत्तर प्रदेशातील माझ्या सर्व कुटुंबीयांना राज्यस्थापना दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. दुहेरी इंजिन सरकार आणि विकासासाठी समर्पित येथील जनतेच्या सहभागामुळे, गेल्या नऊ वर्षांत आपल्या या राज्याने ‘बिमारू’ अवस्थेतून ‘बेमिसाल’ प्रदेश होण्यापर्यंतचा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. देशाची प्रगती गतिमान ठेवण्यात उत्तर प्रदेशाची अपार क्षमता अत्यंत उपयुक्त ठरेल, असा माझा दृढ विश्वास आहे.
भारतीय संस्कृति और विरासत की समृद्धि में अमूल्य योगदान देने वाले उत्तर प्रदेश के अपने सभी परिवारजनों को राज्य के स्थापना दिवस की बहुत-बहुत बधाई। डबल इंजन सरकार और विकास को समर्पित यहां के लोगों की सहभागिता से हमारे इस राज्य ने बीते नौ वर्षों में बीमारू से बेमिसाल प्रदेश बनने का…
— Narendra Modi (@narendramodi) January 24, 2026
***
अंबादास यादव/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com