पीएम्इंडिया
आंध्र प्रदेशातल्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यात नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी एनआयटी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता दिली. केंद्र शासनाकडून या संस्थेला अर्थसहाय्य करण्यात येते. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च ॲक्ट 2007 अंतर्गत ही संस्था येण्याआधी आंध्रप्रदेश सोसायटीज् रजिस्ट्रेशन ॲक्ट 2001 अंतर्गत नोंदणीकृत संस्थेद्वारे ही संस्था चालविली जात होती आणि व्यवस्थापनही या संस्थेद्वारेच करण्यात येत होते.
सरकारच्या धोरणानुसार या एनआयटीमधल्या 50 टक्के जागा राज्यात वास्तव्य असणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. आंध्रप्रदेशातल्या पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट स्तरावरच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी पुरेशा संधी मिळाव्यात हा या एनआयटीचा उद्देश आहे.
N. Chitale / B. Gokhale