Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कझाकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानसोबत क्रीडा क्षेत्रातील सहकार्यासबंधी सामंजस्य करार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज कझाकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानसोबत क्रीडा क्षेत्रातील सहकार्य करण्यासंबंधी सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजूरी दिली असून या सामंजस्य करारावर जुलै 2015 मध्ये स्वाक्षऱ्‍या करण्यात आल्या होत्या.

क्रीडा क्षेत्रातील भारत आणि कझाकिस्तान आणि भारत आणि तुर्कमेनिस्तान दरम्यान द्विपक्षीय आदान-प्रदान कार्यक्रमाअंतर्गत क्रीडा विज्ञान, क्रीडा औषध आणि प्रशिक्षण तंत्र क्षेत्रात ज्ञान आणि कौशल्य विस्तार करण्यात सहकार्य मिळणार आहे. याचा परिणाम म्हणून, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय क्रीडापटूंची कामगिरी सुधारणार आहे.

D. Wankhede/S.Tupe