Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कारगिल विजय दिवसानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या.  हा दिवस मातृभूमीच्या संरक्षणासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांच्या अतुलनीय शौर्य आणि पराक्रमाची आठवण करून देतो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

‘एक्स’ या सामाजिक माध्यमांवरील संदेशात पंतप्रधान म्हणाले की, देशवासियांना कारगिल विजय दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

हा दिवस भारतमातेच्या वीर सुपुत्रांच्या अद्वितीय शौर्याची आणि त्यागाची आठवण करून देतो, ज्यांनी राष्ट्राच्या आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी आपले जीवन अर्पण केले. त्यांचे मातृभूमीवरचे प्रेम आणि बलिदान प्रत्येक पिढीसाठी सदैव प्रेरणादायक ठरेल.

जय हिंद!

***

निखिल देशमुख/राज दळेकर/परशुराम कोर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]