Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केंद्रीय सूचीमध्ये इतर मागासवर्गीयांमधील उप – वर्गीकरणाचा मुद्दा तपासण्यासाठी कलम 340 अन्वये स्थापन आयोगाच्या मुदतवाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय सूचीमध्ये इतर मागासवर्गीयांमधील उप -वर्गीकरणाचा मुद्दा तपासण्यासाठी  कलम 340 अन्वये स्थापन आयोगाला सहा महिने म्हणजेच 31 जानेवारी 2020 पर्यंत मुदतवाढ द्यायला मंजुरी दिली आहे.

फायदे:-

 प्रस्तावित कार्यकाळाला मुदतवाढ मिळाल्यामुळे ‘आयोग’ विविध संबंधितांशी सल्लामसलत करून ओबीसींच्या उप-वर्गीकरणाबाबत  विस्तृत अहवाल सादर करण्यास सक्षम असेल.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar