Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कोलकातामधील नूतनीकरण करण्यात आलेल्या चार वारसा इमारतींच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण


स्त्री आणि पुरुष गणसंस्कृती आणि साहित्याच्या तरंग आणि उमंगाने भरलेल्या कोलकात्याच्या या वातावरणात आल्यावर मन आणि मेंदू आनंदाने भरून जातो. एक प्रकारे ही माझ्यासाठी स्वतःला ताजेतवाने करण्याची आणि बंगालची वैभवशाली कला आणि संस्कृति जाणून घेण्याची आणि त्याला वंदन करण्याची संधी आहे. मित्रांनो आता थोड्या वेळापूर्वी इथे आल्यावर सांस्कृतिक कार्यक्रम पाहिल्यावर अनेक जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तेव्हा खोडकर वय होतेजीवन जीवनातील रहस्ये  उलगडणे  आणि सोडवणे जसे प्रत्येक किशोरवयीन मुलाच्या मनात असायचेतसे माझ्याही मनात होते. खूप काही जाणून घ्यायची उत्कट इच्छा असायची. अनेक प्रश्न असायचेआणि ढीगभर उत्तरेही असायची त्यापैकी अनेक उत्तरे निवडणे खूप कठीण असायचे. त्या प्रश्नांच्या निराकरणासाठीस्पष्टीकरणासाठी कधी इथे तर  कधी तिथे शोध सुरु असायचा. आणि तेव्हा त्या वयात कोलकात्याची ही भूमीबेलूरमठची ही पवित्र माती मला इथे घेऊन यायची.

आज तुमच्याबरोबर असतानाया सर्व गोष्टींकडे पाहत होतो तेव्हा मन त्या भावनांनी भरून गेले होते. आणि हे प्रदर्शनअसे वाटत होते जणू काही ते क्षण मी स्वतः जगत आहे जे त्या महान चित्रकारांनीकलाकारांनी रंगकारानी रचले आहेतजगले आहेत. बांग्ला भूमीची,  बंगालच्या मातीची ही अद्भुत शक्तिआकर्षित करणारा सुगंध यांना वंदन करण्याची ही मला संधी आहे. याच्याशी निगडित भूतकाळातील आणि वर्तमानातील सर्वांना मी आदरांजली अर्पण करतो.

मित्रांनो आज पश्चिम बंगालसह भारताच्या कलासंस्कृती आणि साहित्य क्षेत्रात एक खूप महत्‍वपूर्ण दिवस आहेखूप मोठा दिवस आहे. भारताची कलासंस्‍कृती आपला वारसा 21 व्या शतकानुसार जपण्यासाठी आणि त्यांचे पुनरुत्थाननूतनीकरण आणि पुनर्वसन करण्याचे देशव्यापी अभियान आज पश्चिम बंगालच्या या मातीतून सुरु होत आहे. या अभियानाचा खूप मोठा फायदा कोलकातालापश्चिम बंगालला तर मिळणार आहेच. यासाठी पश्चिम बंगालच्या कला आणि संस्कृतीशी संबंधित  तुम्हा सर्व सहकाऱ्यांना आणि कलासंस्‍कृतीसाठी समर्पित बंगालच्या जनतेचे मी खूप-खूप अभिनंदन करतो.

मित्रांनो परंपरा आणि पर्यटनहे दोन असे विषय आहेत ज्यांचा आपल्या वारशाशी आणि आपल्या भावनांशीआपल्या ओळखीशी थेट संबंध आहे. केंद्र सरकारचा प्रयत्न आहे कि भारताच्या सांस्कृतिक सामर्थ्याला नव्या रंगरूपात जगासमोर आणायचाजेणेकरून भारत जगात वारसा पर्यटनाचे मोठे केंद्र बनून उदयाला येईल. वारसा पर्यटनाची पश्चिम बंगालसह संपूर्ण देशातील पर्यटन उद्योग मजबूत करण्यात खूप मोठी भूमिका राहील. यामुळे पश्चिम बंगालसह संपूर्ण देशात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील.  या कार्यक्रमानंतर रविंद्र सेंतु-हावड़ा ब्रिज  पर्यटकांसाठी अधिक आकर्षक बनवण्यासाठी  इंटरेक्टिव प्रकाश आणि ध्वनी सुविधा देखील सुरु होणार आहे.

मित्रांनोआपल्या सांस्कृतिक प्रतीकांचे जतन व्हावे आणि त्यांचे आधुनिकीकरण देखील व्हावे ही देशाची नेहमीच इच्छा राहिली आहे. या भावनेशी सहमत होतकेंद्र सरकार देशातील ऐतिहासिक इमारतींचे नूतनीकरण आणि जीर्णोद्धार करत आहे. कोलकातादिल्लीमुंबईअहमदाबाद आणि वाराणसीच्या वारसा स्थळांपासून याची सुरुवात केली जात आहे. .या इमारतींमध्ये नवीन दालने नवीन प्रदर्शने नाटके आणि संगीत कार्यक्रमांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. देशातील पाच महत्वाची संग्रहालये आंतरराष्ट्रीय दर्जाची बनवली जाणार आहेत. याची सुरुवात जगातील सर्वात जुन्या संग्रहालयांपैकी एक कोलकातातील भारतीय  संग्रहालयापासून केली जात आहे. याशिवाय दिल्लीचेन्नईहैदराबादश्रीनगरमधल्या विद्यमान संग्रहालयांचा दर्जा देखील उंचावला जात आहे. मित्रांनो देशातील ही वारसा स्थळे जतन करणेत्यांचे संवर्धन करणे तर गरजेचे आहेच मात्र त्यावर देखरेख आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक निधीचीही तरतूद करायला हवी.  हे लक्षात घेऊन भारतीय वारसा संवर्धन संस्थेची निर्मिती आणि त्याला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याबाबत विचार सुरु आहे.

मित्रानोकोलकाताभारताच्या सर्वोच्च सांस्कृतिक केंद्रांपैकी एक आहे. तुमच्या भावना लक्षात घेऊन आता कोलकाताची ही समृद्ध ओळख नव्या रंगरूपात जगासमोर आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कोलकाताची 4 महत्वपूर्ण दालनेओल्ड करन्सी इमारत असेलबेल्वेडेयर हाउस असेलविक्टोरिया मेमोरियल असेल किंवा मेटकाफ हाउस असेलयांच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. इथे केंद्र सरकारची जी टांकसाळ आहेतिला नाणे आणि वाणिज्य संग्रहालय म्हणून विकसित करण्याचा देखील विचार आहे.

मित्रांनो व्हिक्टोरिया मेमोरियलच्या 5 दालनांपैकी 2 दालने दीर्घकाळ बंद राहणे हे बरोबर नाही. गेल्या काही दिवसांपासून ते पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु होते. माझी विनंती आहे कि जे तिसरे दालन आहेतिथे स्वात्रंत्र्य चळवळीत बंगालच्या क्रांतिकारकांनी दिलेल्या योगदानाला स्थान दिले जावे.

विप्लवी भारत नावाने संग्रहालय व्हावेज्यात नेताजी सुभाषचंद्र बोसऑरबिंदो घोषरास बिहारी बोसखुदी राम बोसदेशबंधुबाघा जतिनबिनॉयबादलदिनेश,यासारख्या प्रत्येक महान सैनिकाला स्थान मिळायला हवे. मित्रांनो स्वातंत्र्यानंतरच्या दशकांमध्ये जे झालेनेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याबद्दल ज्या भावना देशाच्या मनात होत्यात्या आपण सगळेच जाणतो. देशाच्या त्या भावनांचा सन्मान करत नेताजी यांच्या नावाने लाल किल्ल्यावर संग्रहालय उभारण्यात आलेअंदमाननिकोबार बेटांपैकी एका बेटाचे नामकरण नेताजींच्या नावे करण्यात आले. जेव्हा आझाद हिंद सरकारला 75 वर्ष पूर्ण झाली तेव्हा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्याचे सौभाग्य मला स्वतःला लाभले. नेताजी यांच्याशी संबंधित फाईली खुल्या करण्याची मागणी अनेक वर्षे होत होतीजी आता पूर्ण झाली आहे. 

मित्रांनो, नव्या वर्षातनव्या दशकात आता पश्चिम बंगालच्या अन्य सुपुत्रांच्या योगदानाचाही योग्य सन्मान व्हायला हवा असे देशाला वाटत आहे. आता आपण सर्वजण ईश्वर चंद्र विद्यासागरजी यांची 200वी जयंती साजरी करत आहोत. तसेच 2022 मध्ये जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होतीलतेव्हा आणखी एक सुखद योगायोग घडत आहे. 2022 मध्ये महान समाज सुधारक आणि शिक्षणतज्ञ राजा राममोहन राय यांची 250 वी जयंती येते आहे. देशाचा आत्मविश्वास जगवण्यासाठीसमाजात मुलीबहिणीयुवकांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले आहेततो वारसा पुढे चालू ठेवण्याची गरज आहे. त्यांचे 250 वे  जयंती वर्ष आपण एक पर्व म्हणून साजरे करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

मित्रांनो देशाचा वारसा जपणेआपली महान व्यक्तिमत्वेआपल्या इतिहासाचे हेच चित्रण राष्ट्र निर्माणाचा प्रमुख घटक असतो. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे कि इंग्रजांच्या राजवटीदरम्यान आणि स्वातंत्र्यानंतर देखील देशाचा जो इतिहास लिहिण्यात आलात्यात इतिहासातील काही महत्वाच्या बाबी वगळण्यात आल्या आहेत.

मित्रांनो गुरुदेव टागोरांनी 1903 मध्ये आपल्या लेखात जे लिहिले होतेत्याचा उल्लेख आज मला बंगालच्या या पवित्र भूमीवर आवर्जून करायचा आहे. त्यांनी लिहिले होते-भारताचा इतिहास तो नाही जो आपण परीक्षांसाठी वाचतो आणि आठवतो. काही लोक बाहेरून आलेपिता आपल्या मुलाची हत्या करतोभावाभावांमध्ये मारामारीसिंहासनासाठी संघर्ष होत राहिला हा भारताचा इतिहास नाही. या इतिहासात तर या गोष्टीचे वर्णनच नाही कि तेव्हा भारताचे नागरिकभारताचे लोक काय करत होतेत्यांचे काही अस्तित्वच नव्हते का?

मित्रांनो गुरुदेवांनी आपल्या लेखात एक अतिशय महत्वपूर्ण उदाहरण देखील दिले होते वादळाचे. त्यांनी लिहिले होते की, कितीही वादळे येवोतत्या संकटाच्या वेळीतिथल्या लोकांनी त्या वादळाचा सामना कसा केला हे अधिक महत्वाचे असते.

मित्रांनो गुरुदेवांनी एका गोष्टीकडे लक्ष वेधले होते कि इतिहासकारानी ते वादळ घराच्या बाहेरूनच पाहिले. जे लोक त्या वादळाचा सामना करत होतेते इतिहासकार त्यांच्या घरी गेलेच नाहीत. आता जे बाहेरून पाहतील त्यांना केवळ वादळच दिसेल ना . त्या वादळाचातेव्हा तिथल्या सामान्य लोकांनी कसा सामना केला याकडे इतिहासकारांची नजर गेलीच नाही. त्यामुळे भारतवर्षाच्या इतिहासातील अनेक गोष्टी मागेच राहिल्या.

मित्रांनोआपल्या देशाचा इतिहास आणि त्याचा वारसा यावर नजर टाकलीतर काही लोकांनी सत्तेचा संघर्षहिंसाउत्तराधिकाराची लढाई यापुरताच सीमित ठेवलेला आढळतो. मात्र या सगळ्यामध्येजसे गुरुदेव म्हणाले इतिहासाचा जो आणखी एक पैलू आहे तो अधिक महत्वपूर्ण आहे. आज मला त्याबाबतही तुमच्यासमोर चर्चा करायची आहे.

मित्रांनोअस्थिरतेच्या त्या काळातहिंसाचाराच्या वातावरणातत्याचा सामना करणेदेशाची चेतना जागृत ठेवणेती सांभाळणेती पुढल्या पिढी पर्यंत पोहोचवणे देखील महत्वाचे होते. दशकामागून दशकेपिढयानपिढ्या शतकामागून शतके हे कार्य कुणी केले ?” आपली कलाआपले संतआपले प्रेक्षक यांनी केले.आणि म्हणूनच भारताच्या काना-कोपऱ्यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कला आणि संगीताशी संबंधित विशेष परंपरा पाहायला मिळतील. भारतातील प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला बुद्धीजीवीसंतांचा प्रभाव पाहायला मिळेल.  या  व्यक्तींनीत्यांच्या विचारांनी,कला आणि साहित्याच्या विविध स्वरुपानी इतिहास आपल्या परीने समृद्ध केला आहे  सनी तुम्ही हे सगळे चांगल्या तऱ्हेने जाणता कि अशा महान व्यक्तींनी, , भारताच्या इतिहासातील काही सर्वात मोठ्या सामाजिक सुधारणांचे नेतृत्व केले. भारताला आदि शंकराचार्यथिरुनावुक्कारासार यांच्यासारख्या कवी संतांचा आशीर्वाद मिळाला. अंदालअक्का महादेवीभगवान बसवेश्वरगुरु नानक देवजी द्वारा दाखवण्यात आलेला मार्ग आजही आपल्याला प्रेरणा देतो. जेव्हा भारताच्या निरनिराळ्या भागात भक्ती आंदोलन सुरु झाले तेव्हा त्या प्रदीर्घ काळात अनेक संत आणि सुधारकांची गीतेविचार यांनी त्याला सम्रुद्ध केले. संत कबीरतुलसीदासजीएकनाथ जीनामदेव जीसंत तुकाराम जी समाजाला जागरूक करतच राहिले. भारतातील असा कुठलाही कोपरा नव्हता जिथे त्या काळात अशा प्रकारचे महापुरुष कार्यरत नव्हते. समाज परिवर्तनासाठी राजा राममोहन राय जी आणि ईश्‍वरचंद्र विद्यासागरजी यांनी केलेले प्रयत्न आजही तेवढेच प्रेरणादायी आहेत. अशा प्रकारे आपण ज्योतिबा फुलेसावित्रीबाई फुलेगांधीजीबाबासाहेब आंबेडकरयांच्यासारख्या अनेक व्यक्तिमत्त्वांना भारताला, भारताच्या इतिहासाला समृद्ध करताना पाहिलं आहे.

सामाजिक सुधारणासमाजातील कुप्रथांविरोधात आवाज उठवणेत्या काळात महिला सबलीकरणाचे एवढे प्रयत्न करणेहे देशाची चेतना जागरूक ठेवण्याचे ते प्रयत्न होते. आणि जितकी नावे तुम्ही ऐकलीअनेक नावे मी घेऊ शकलो नाही मात्र त्यांनी साहित्यकलासंगीत यांनाच आपल्या संदेशाचे माध्यम बनवले. हीच आहे  कला-संगीत-साहित्य यांची ताकद. त्यांनी शस्त्रांच्या शक्तीने नाहीलोकशक्तीने  परिवर्तन आणण्याचा इतिहास रचला. शस्त्रासमोर त्यांनी शास्त्राचे सामर्थ्य दाखवून दिले.

मित्रांनोकुठल्याही प्रदेशाच्या आत्म्याचे प्रतिनिधित्व तिथल्या लोकांच्या भावना करतात. गीतसंगीतकला-साहित्य यांच्या माध्यमातून जे सांगितले जातेतीच लोकभावना असते. राजकीय आणि सैन्यशक्ति तर तात्पुरती असतेमात्र कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून ज्या लोकभावना अभिव्यक्त होतात ,त्या कायमस्वरूपी असतात. आणि म्हणूनच आपला समृद्ध इतिहासआपला वारसा जतन करणेत्याचे संवर्धन करणे भारतासाठीप्रत्येक भारतीयांसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. हीच एक अशी संपत्ती आहे जी आपल्याला जगातील अन्य देशांपासून वेगळी करते. 

मित्रांनोसंस्कृतीचे रक्षण करण्याबाबत डॉक्टर श्‍यामप्रसाद मुखर्जी म्हणाले होते-आम्हाला दुःख या गोष्टीचे नाही कि पाश्चिमात्य ज्ञानाचे दरवाजे आपल्यासाठी उघडले. दुःख या गोष्टीचे आहे की, हे ज्ञान आपल्यावर भारतीय संस्कृतीशी तडजोड करत थोपवण्यात आले. दोन्हीमध्ये समन्वय साधण्याचीज्यात भारतीय संस्कृतीला नजरेआड केले जाणार नाहीती संपवली जाणार नाही हे पाहणे गरजेचे होते. डॉक्टर मुखर्जी यांचे हे मत त्या काळी देखील महत्वपूर्ण होते आणि आजही  प्रासंगिक आहे. आपल्याला जगातील प्रत्येक संस्कृतीकडून काही ना काही शिकायला मिळू शकतेमात्र भारतीय संस्कृतीच्या मूल्यांवर गदा येणार नाही याकडेही लक्ष द्यायला हवे.

मित्रांनोबंगाली भूमीत जन्मलेले आणि वाढलेले सुपुत्रसंत यांनी नेहमीच भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे महत्त्व समजून घेतले आणि त्याद्वारे बौद्धिक नेतृत्व दिले. जरी आकाशात फक्त एकच चंद्र चमकतो मात्र पश्चिम बंगालने जगाला भारताची चमक दाखवण्यासाठी अनेक चंद्र दिले आहेत. नेताजी सुभाष चंद्रशरत चंद्रबंकिम चंद्रईश्वर चंद्रजगदीश चंद्रकेशव चंद्रबिपीन चंद्र अशा अनेक चंद्रांनी भारताची ओळख आणखीनच उजळवली आहे.

चैतन्य महाप्रभु यांच्यापासून ते राजा राम मोहन रॉयस्वामी विवेकानंद आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्यापर्यंत अनेकांनी संपूर्ण जग आणि संपूर्ण भारताला  जागृत करण्याचे कार्य केले आहे. या सर्व महापुरुषांनी संपूर्ण जगाला सांगितले की खरा भारत काय आहे आणि त्याची खरी ताकद काय आहे. आपले खरे भांडवल ही आपली संस्कृती आहेआपले भूतकाळाचे ज्ञान -विज्ञान आहे याची जाणीव त्यांनी भारतालाही करून दिली. नझरुल इस्लाम आणि लालन फकीर यांच्या कविता आणि सत्यजित रे यांच्या चित्रपटांनीही या विचारसरणीचा विस्तार केला आहे.

मित्रांनोभारताचे ज्ञान-विज्ञान आणि प्राचीन ओळख यांच्याशी देशाला आणि जगाला परिचित करून देण्याचे काम जे बंगालच्या मातीने केले आहे तो वारसा नवीन भारतात देखील जिवंत ठेवण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहेइथल्या तरूणांची जबाबदारी आहे. हीच योग्य वेळ आहे येथून प्रत्येक क्षेत्रात नवीन आणि सक्षम नेतृत्व निर्माण करण्याची जे संपूर्ण जगात भारताचे प्रतिनिधित्व करू शकेल. मिशिगन विद्यापीठात काही लोकांशी संवाद साधताना स्वामी विवेकानंद जे म्हणाले होते ते शब्द आपण सर्वानी लक्षात ठेवले पाहिजेत.

स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले होते-  भले सध्याचे शतक तुमचे आहेपरंतु 21 वे शतक भारताचे असेल. स्वामी विवेकानंदांचा तो विश्वासतो संकल्प सिद्ध करण्यासाठी आपण सर्वांनीप्रत्येक भारतीयाने  पूर्ण शक्तीने अविरत काम करत राहायला हवे. आणि या मोहिमेमध्येजेव्हा पश्चिम बंगालचा बौद्धिक वर्गतुम्हा सर्व साथीदारांची ऊर्जातुमचा आशीर्वाद मिळेल तेव्हा संकल्प पूर्ण करण्याचा वेगही आणखी वाढेल.  मी स्वतः आणि केंद्र सरकार देखील तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला साथ देण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्याकडून शिकण्याचाही प्रयत्न करू. आजच्या या महत्वाच्या प्रसंगी ज्या आत्मीयतेने तुम्हाला भेटण्याची आणि तुमच्याशी बोलण्याची संधी दिलीत तुम्ही जो सत्कारसन्मान केलातत्यासाठी मी मनापासून तुम्हा सर्वांचे आभार मानतो. मी देशवासियांना देखील आवाहन करतो कि जेव्हा तुम्ही कोलकाता येथे जाल तेव्हा या चार ऐतिहासिक ठिकाणांना अवश्य भेट द्या. आपल्या त्या महापुरुषांचे विचारत्यांची कलात्यांच्या भावनात्या काळातील जनमानसाची अभिव्यक्ती तुम्ही पहाजाणून घ्या आणि जगालाही दाखवून द्या. खूप खूप धन्यवाद.

 

M.Chopade/S.Kane/P.Kor