Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

क्षयरोग निर्मूलन शिखर परिषदेच्या उद्‌घाटन सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत क्षयरोग निर्मूलन शिखर परिषदेच्या उद्‌घाटन सत्राला संबोधित केले. दिल्ली क्षयरोग निर्मूलन शिखर परिषद म्हणजे क्षयरोग समूळ नष्ट होण्याच्या दिशेने मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. या रोगाच्या निर्मूलनाच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल हे गरिबांचे जीवन सुधारण्यांशी निगडीत आहे, असे ते म्हणाले.

2025 पर्यंत क्षयरोगाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे लक्ष्य भारतानं निश्चित केले असल्याचे पंतप्रधानांनी घोषित केले. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकार सर्वंकष कार्य करत असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात राज्य सरकारांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सर्व मुख्यमंत्र्यांना व्यक्तीश: पत्र लिहिल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

क्षयरोग निर्मूलनात क्षयरोग तज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी यांचा महत्त्वपूर्ण सहभाग असल्याचे ते म्हणाले. या रोगावर मात केलेले रुग्ण इतरांना प्रेरणादायी ठरत आहेत असं पंतप्रधानांनी सांगितले.

इच्छित लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकारच्या वेगवान कार्यवाहीचं उदाहरण देतांना पंतप्रधानांनी ‘मिशन इंद्रधनुष’ आणि ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचे उदाहरण दिले.

B.Gokhale/J.Patankar/P.Kor