Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ख्यातनाम मुस्लिमांच्या प्रतिनिधींनी पंतप्रधानांची भेट घेतली

ख्यातनाम मुस्लिमांच्या प्रतिनिधींनी पंतप्रधानांची भेट घेतली


ख्यातनाम मुस्लिमांच्या एका प्रतिनिधी मंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जाव्वाद, आंतरराष्ट्रीय इस्लामी व्यवहारातील तज्ज्ञ कमार आगा, शाहीद सिद्दीकी आदींचा प्रतिनिधी मंडळात समावेश होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या यशस्वी सौदी अरेबिया भेटीबद्दल प्रतिनिधी मंडळाने त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कार्यक्रमामुळे पश्चिम आशिया, मध्य आशिया आणि उत्तर आफ्रिकेतील लोक, विशेषत: तरुण खूप प्रभावित झाले असून, त्यांना भारताबरोबर चांगले संबंध हवे आहेत, असे प्रतिनिधी मंडळाने स्पष्ट केले.

नरेंद्र मोदी यांच्या विकास कार्यक्रमाबद्दल आणि यशस्वी अंमलबजावणीबद्दल प्रतिनिधी मंडळातील सदस्यांनी पंतप्रधानांची प्रशंसा केली.

पंतप्रधानांनी प्रतिनिधी मंडळाला धन्यवाद दिले. तसेच शिक्षण आणि मुलींच्या शिक्षणावर भर देत, विकासाप्रती असलेल्या कटीबद्धतेचा पुनरुच्चार केला. रालोआ सरकारने सुरु केलेल्या ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ आणि ‘मुद्रा योजना’ यासारख्या कल्याणकारी योजनांमधून मिळणारे मोठे फायदे प्राप्त करण्यात भारतातील मुस्लिम समाज यशस्वी होईल, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

J. Patankar / B. Gokhale