Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुरगाव येथील आंतरराष्ट्रीय सौर आघाडी मुख्यालयाच्या

गुरगाव येथील आंतरराष्ट्रीय सौर आघाडी मुख्यालयाच्या

गुरगाव येथील आंतरराष्ट्रीय सौर आघाडी मुख्यालयाच्या


व्यासपीठावर उपस्थित फ्रान्सचे राष्ट्रपती ओलांद, फ्रान्सहून आलेले सर्व वरिष्ठ मंत्री, हरियाणाचे राज्यपाल, मुख्यमंत्री, पियुष गोयल, फ्रान्सचे शिष्टमंडळ आणि मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या प्रिय बंधु आणि भगिनीनो.

मागच्या एका वर्षात जगात या गोष्टीची चर्चा होती की ग्लोबल वार्मिंगला सामोरे जाण्यासाठी जगाने कोणते पाऊल उचलले पाहिजे कोणत्या बाबींचा संकल्प केला पाहिजे? त्याच्या पूर्ततेसाठी कोणते मार्ग अवलंबिले जावे? पॅरिसमधील सीओपी 21 संबंधी संपूर्ण जगाला उत्सुकता होती. संबंधित सर्व व्यक्ती आपापल्या पद्धतीने त्यावर प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते आणि सुमारे दोन आठवडे जगातील सर्व देशांनी मिळून, या विषयातील तज्ज्ञ एकत्र आले, चर्चा केली आणि या मोठ्या संकटापासून मानवजातीचे कसे रक्षण करता येईल, त्यासाठी संकल्प करुन पुढे वाटचाल करतील.

सीओपी 21 च्या निर्णयांसंबंधी तर जगात बऱ्याच चांगल्या गोष्टी पोहचल्या आहेत पण पॅरिसच्या भूमीवर जेंव्हा एकीकडे सीओपी 21 ची चर्चा सुरू होती तेंव्हा दोन महत्त्वपूर्ण निर्णयासाठी पुढाकार घेतला होता. या दोन्ही महत्वूर्ण निर्णयासाठी भारत आणि फ्रान्स यांची भूमिका महत्वाची होती. एक निर्णय म्हणजे जागतिक हवामानबदलाची काळजी आहे, मानवजातीला पर्यावरणाच्या संकटापासून वाचवायचे आहे, आणि दुसरीकडे मानवजातीच्या गरजांची पूर्तताही करायची आहे. विकसनशील देश आहेत, त्यांना अद्याप विकासाची नवनवीन शिखरे गाठावयाची आहेत आणि ऊर्जेशिवाय विकास शक्य नाही. एकप्रकारे ऊर्जा विकासयात्रेचा अविभाज्य घटक बनली आहे. पण जर जैविक इंधनापासून ऊर्जानिर्मिती केली तर ग्लोबल वार्मिंगची समस्या सतावते, आणि जर ऊर्जा निर्मिती केली नाही तर, तर अंधार पसरतो, आयुष्य अंधारात बुडून जाते. मग या द्विधा अवस्थेपासून जगाला वाचवण्यासाठी काय मार्ग असू शकेल? आणि तेंव्हा कुठे अमेरिका, फ्रान्स, भारत तिघांनी मिळून एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि निर्णय आहे नवनवीन कल्पनांचा. नवीन संशोधन असेल, नवीन संसाधने निर्माण होतील, आमचे वैज्ञानिक, आमचे तंत्रज्ञ, आमचे अभियंते, हे नव्या बाबी घेऊन येतील ज्या पर्यावरणावर विपरीत परिणाम करणार नाहीत. ग्लोबल वार्मिंगपासून जगाला वाचवण्यासाठीचा मार्ग दाखवतील आणि अशी साधने निर्माण करावी, जी स्वस्त आणि शाश्वत असतील, गरीबातील गरीब व्यक्तीच्या आवाक्यात असतील. म्हणून नवनवीन कल्पनांसाठी एक मोठी चळवळ उभारण्याच्या दिशेने अमेरिका, फ्रान्स आणि भारत यांनी जगातील अशा सर्व प्रणालींना सोबत घेऊन पुढे जाण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि त्याचा शुभारंभ केला. अध्यक्ष ओबामा, अध्यक्ष ओलांद, आणि मी तसेच संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस आणि बिल गेटस, या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि एक नव्या निर्णयाची सुरुवात केली. दुसरा एक महत्वाचा निर्णय झाला, ज्याचा आगामी दशकांमध्ये मानवी आयुष्यावर मोठा प्रभाव असणार आहे.

जगात बऱ्याच संघटना कार्यरत आहे. ओपेक राष्ट्रांचा समूह आहे, जी-20, जी-4, सार्क, युरोपिय संघ, असियान देशांचा समूह, अनेक प्रकारचे समूह जगात आहेत. भारताने जगासमोर एक विचार मांडला जर पेट्रोल उत्पादक राष्ट्र एकत्र येऊ शकतात, आफ्रिकी देश एकत्र येऊ शकतात, युरोपीय देश एकत्र येऊ शकतात, तर मग ज्या देशांमध्ये 300 दिवसांपेक्षा जास्त काळ सूर्यप्रकाश उपलब्ध आहे, अशा राष्ट्रांचा समूह का होऊ शकत नाही. हा सूर्य, आयुष्यासाठी फार मोठ्या शक्तीचा स्रोत आहे, सृष्टी चालवण्यासाठी सूर्याची भूमिका महत्त्वाची आहे. मग आम्ही त्याला एका शक्तीच्या रुपाने स्वीकारुन विश्व कल्याणाचा मार्ग का शोधू नये? 300 दिवसापेक्षा अधिक काळ सूर्य प्रकाशाचा लाभ मिळतो असे जगात सुमारे 122 देश आहेत. म्हणून विचार आला की, आम्ही 122 देश जे सूर्यशक्तीने प्रभावित आहेत त्यांचा एक समूह तयार करावा. भारताने इच्छा व्यक्त केल्यानंतर फ्रान्सच्या अध्यक्षांनी माझी पूर्ण मदत केली, आम्ही खांद्याला खांदा लावून काम केले, इतर देशांशी संपर्क साधला, नोव्हेंबर महिन्यात पॅरिसमध्ये जेंव्हा परिषद सुरू होती, 30 नोव्हेंबर रोजी जगातील सर्व राष्ट्रप्रमुख त्या सोहळ्याला उपस्थित होते आणि त्यावेळी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी संस्थेचा उदय झाला.

त्यावेळी हा ही निर्णय झाला होता की, याचे आंतरराष्ट्रीय सचिवालय भारतात असेल. आता हे आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडीचे मुख्यालय गुरगावमध्ये निर्माण होत आहे. हरियाणा कुरुक्षेत्राची भूमी आहे, गीतेचा संदेश ज्याठिकाणाहून दिला होता, त्या भूमीवरुन विश्व कल्याणाचा एक नवा संदेश या सौर आघाडीच्या रुपाने आम्ही देत आहोत.

फार कमी लोकांना माहित असेल की आज ही जी घटना होत आहे त्याचा मानवजातीवर किती मोठा प्रभाव असणार आहे, ही गोष्ट त्यांनाच समजू शकते, जे छोट्या छोट्या बेटांवर वसले आहेत, छोटी बेटे, राष्ट्रे आहेत, त्यांच्यासमोर ही भीती आहे की समुद्रात जर पाण्याची पातळी वाढली तर त्यांचा देश बुडेल, ते या सृष्टीतून समाप्त होतील. दिवस-रात्र या छोट्या छोट्या राष्ट्रांना चिंता सतावते आहे. जे देश समुद्रकिनारी आहेत, त्या देशांना चिंता सतावते आहे की जर ग्लोबल वार्मिंगमुळे समुद्राची पातळी वाढली तर माहित नाही आमच्या मुंबईचे काय होईल, चेन्नईचे काय होईल, आणि जगात असे बरेच देश असतील ज्यांच्या मोठ-मोठ्या जागा समुद्रकिनारी आहेत, त्यांचे भविष्य काय असेल? सारे जग यामुळे चिंतीत आहे. मी मागच्या एक वर्षापासून, हे द्वीप राष्ट्र आहेत, जी छोटी छोटी राष्ट्रे आहेत त्यांच्या नेत्यांना भेटलो आहे, त्यांचे दुःख मला समजले आहे. काय भारत याबाबतीत आपले कर्तव्य बजावू शकत नाही?

आपल्या देशात जीवनदान एक फार मोठे पुण्य मानले जाते. आज मी सांगू शकतो की आंतरराष्ट्रीय सौर आघाडी त्या जीवनदानाचे पुण्य कर्म करणार आहे, जे आगामी दशकांमध्ये जगावर आपला प्रभाव पाडणार आहे. सारे जग म्हणते की, तापमान कमी झाले पाहिजे, पण तापमान कमी करण्याचा मार्गही सूर्याचे तापमानच आहे. एका ऊर्जेपासून दुसऱ्या ऊर्जेचे संकट दूर केले जाऊ शकते. म्हणून जगाची ऊर्जेची गरज पूर्ण होईल, नवकल्पनांचे काम होईल आणि सौर ऊर्जेमुळे आयुष्यातील विविध क्षेत्रे कशी प्रभावित होतील त्या दिशेने काम करता येईल.

ही बाब खरी आहे की आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्यालय भारतात होत आहे, गुरगावमध्ये होत आहे, पण ही संस्था केवळ भारताची संस्था नाही, ही जागतिक संस्था आहे, स्वायत्त संस्था आहे. जसा अमेरिकेत संयुक्त राष्ट्रसंघ आहे, पण ती पूर्ण जगाची आहे. जागतिक आरोग्य संघटना आहे, त्याप्रमाणेच या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्यालय हा पूर्ण जगाचा वारसा आहे आणि तो स्वतंत्रपणे कार्य करेल. वेगवेगळ्या राष्ट्रातील लोक याचे नेतृत्व करतील, वेगवेगळ्या राष्ट्रातले लोक याची जबाबदारी सांभाळतील, त्याची एक कार्यपद्धती विकसित होईल, आज याचे सचिवालय उभे राहत आहे, या सचिवालयाच्या माध्यमातून ही बाब आम्ही पुढे नेऊ इच्छितो.

भारताने ऊर्जा क्षेत्रात पारंपरिक नैसर्गिक साधनांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने जेंव्हा सांगितले की आम्ही 175 गिगावॅट, नवीकरणीय ऊर्जेकडे जाऊ इच्छितो, तेंव्हा जगासाठी ही आश्चर्याची बाब होती. भारतात गिगावॅट शब्द नवीन आहे, जेंव्हा आम्ही मेगावॅटच्या पुढे विचारही करत नव्हतो. आज आम्ही गिगावॅट वर विचार करत आहोत आणि 175 गिगावॅट सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, अणु ऊर्जा, बायोमासपासून निर्माण होणारी ऊर्जा या सर्व स्रोतांना जलविद्युत आम्ही उपलब्ध करु इच्छितो आणि मला आनंद आहे की आज भारत 5000 मेगावॅटपेक्षा जास्त सौर ऊर्जा निर्माण करत आहे. हे एवढ्या कमी वेळेत जे काम झाले आहे ते या निर्धाराचा परिणाम आहे. काय भारत मानवजातीच्या कल्याणासाठी मानवजातीच्या रक्षणासाठी, निसर्गाच्या रक्षणासाठी, ही जी सृष्टी आहे तिच्या रक्षणासाठी, भारत आपले काही योगदान देऊ शकतो का? ते योगदान देण्यासाठी हे कार्य हाती घेतले आहे.

मी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा मनापासून आभारी आहे की, या चिंतेच्या वेळी, ग्लोबल वार्मिंग, पर्यावरणाच्या मुद्यावर जे मार्ग आहेत यावर त्यांचे विचार आणि भारताचे विचार समान आहेत कारण फ्रान्स आणि भारताची मुल्यं यांच्यात बरेच साम्य आहे. म्हणून मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात आम्ही भेटलो होतो, तेंव्हा आम्ही ठरवले होते की, सीओपी 21 च्या वेळी एक पुस्तक प्रकाशित करु आणि जगात पारंपरिकरित्या या मुद्यांकडे कसे पाहिले जाते यावर संशोधन करु. आम्ही दोघांनी मिळून या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे आणि जगासमोर त्यांचेच मूळ विचार काय होते हे सादर केले आहे.

हे सर्व आम्ही यासाठी करत आहोत कारण मानवजातीला या संकटापासून वाचवण्यासाठी जे मार्ग शोधले जात आहेत, तो एक सामुहिक प्रयत्न असला पाहिजे, नव्या संकल्पानांच्या आधारे हा प्रयत्न असावा, आणि याचा परिणाम असा असावा की जो मानवजातीच्या गरजांची पूर्तता करेल पण निसर्गाची हानी होणार नाही. आम्ही असे लोक आहोत, ज्यांच्या पूर्वजांनी आम्हाला या भूमीवर प्रेम करण्यास शिकवले. आम्हाला कधीच निसर्गाचे शोषण करण्याची शिकवण मिळाली नाही. रोपट्यामध्येही देव असतो, ही शिकवण आम्हाला लहानपणापासून दिली आहे. ही आमची परंपरा आहे. जर ही परंपरा असेल तर जगाला त्याचा फायदा झाला पाहिजे या दिशेने आपण काहीतरी करुन दाखवले पाहिजे आणि त्या अंतर्गत आज आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या सचिवालयाचा आम्ही शुभारंभ करत आहोत. भविष्यात एका भव्य इमारतीच्या रुपाने याची बांधणी होईल, एक स्वतंत्र इमारत तयार होईल, यासाठी पायाभरणी करत आहोत आणि या कार्यासाठी तुम्ही आलात त्याबद्दल मी आभारी आहे.

माझ्यासाठी आनंदाची बाब आहे की, सौर आघाडी निर्माण होत आहे आज आम्ही दिल्लीहून येणार होतो, आम्ही रस्त्यानेही आलो असतो, हेलिकॉप्टरनेही आलो असतो, पण आम्ही दोघांनी मिळून ठरवले की आम्ही मेट्रोने जाऊ आणि आज आपल्यामध्ये आम्हाला मेट्रोने येण्याची संधी मिळाली.

मी राष्ट्राध्यक्षांचा आभारी आहे, की त्यांनी आज मेट्रोने येण्यास होकार दिला आणि आम्ही मेट्रोचा प्रवास करत आपल्यामध्ये पोहचलो. कारण हाही एक संदेश आहे ग्लोबल वार्मिंगची लढाई लढण्याच्या ज्या पद्धती आहेत, त्यात ही सुद्धा एक पद्धत आहे. मला विश्वास आहे की हा प्रयत्न सुखदायी असेल. उद्या भारत प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे, या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मी देशवासियांना अनेक शुभेच्छा देतो आणि अधिकार व कर्तव्य या दोहोंचा समतोल साधून आम्ही देशाला पुढे नेऊ याच माझ्या शुभेच्छा आहेत. खूप खूप धन्यवाद.

S.Thakur/ I.Jhala/ M.Desai