Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गृहनिर्माण आणि मानवी वस्ती या क्षेत्रात माहितीचे आदानप्रदान आणि तांत्रिक सहकार्य यासाठी भारत आणि मोरक्को यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराबाबत मंत्रिमंडळाला अवगत करण्यात आले


गृहनिर्माण आणि मानवी वस्ती या क्षेत्रात माहितीचे आदानप्रदान आणि तांत्रिक सहकार्य यासाठी फेब्रुवारी 2019 मध्ये भारत आणि मोरक्को यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराबाबत मंत्रिमंडळाला अवगत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली.

कराराच्या अंमलबजावणीमुळे गृहनिर्माण आणि मानवी वस्ती क्षेत्रात दोन्ही देशांमधले सहकार्य बळकट होईल. दोन्ही देशांमधले वाणिज्य आणि व्यापार संबंध सुधारण्याबरोबरच शाश्वत सर्वसमावेशक शहरी विकासाला चालना देण्यात शहरांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर उत्तरे शोधण्यासाठी दोन्ही देश सहकार्य करतील. यात प्रामुख्याने परवडणारी घरे पाणीपुरवठा व स्वच्छता, शहर परिवहन व स्मार्ट शहरांचा विकास यांचा समावेश आहे. मात्र हे सहकार्य एवढ्यापुरताच मर्यादित नाही.

N.Sapre/S.Kakade/D. Rane