Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गोरखपूर येथे नवीन अखिल भारतीय वैद्यकीय संस्था स्थापन करायला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे नवीन अखिल भारतीय वैद्यकीय संस्था स्थापन करायला मंजुरी दिली.

गोरखपूर येथे नवीन एम्सची स्थापना करण्यासाठी 1011 कोटी रुपये खर्च येणार आहे. या खर्चात पगार, परिचालन आणि देखभाल खर्चाचा समावेश नाही. हा खर्च संबंधित नवीन एम्स संस्था त्यांच्या वार्षिक तरतुदींमधून करतील, जी त्यांना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेच्या नियोजित व्यय प्रमुखांकडून अनुदान स्वरुपात दिली जाते.

या संस्थेत 750 खाटांचे रुग्णालय असेल, ज्यामध्ये आपातकालीन खाटा, आयुष खाटा, खासगी, अतिदक्षता विशेष आणि सुपर स्पेशालिटी खाटा यांचा समावेश असेल. याशिवाय, प्रशासकीय विभाग, आयुष विभाग, सभागृह, रात्रनिवारा, वसतिगृह आणि निवासी सुविधा असतील.

नवीन एम्सच्या स्थापनेमुळे लोकांना विशेष आरोग्य सेवा पुरवण्याचा तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत निर्माण करण्यात येणाऱ्या प्राथमिक आणि दुय्यम स्तरावरील संस्थांसाठी डॉक्टर आणि आरोग्य कार्यकर्ते उपलब्ध होतील. या संस्थेत प्रादेशिक आजारांवर देखील संशोधन केले जाणार आहे.

नवीन एम्सच्या स्थापनमुळे, पूर्व उत्तर प्रदेशच्या संपूर्ण परिसरातील लोकांना लाभ होईल.

S.Kane/B.Gokhale