Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ग्रामीण महिला सौर अभियंत्यांनी (सोलर मामाज) दार-ए-सलाम येथे पंतप्रधानांसमोर कौशल्य प्रात्यक्षिके सादर केली

ग्रामीण महिला सौर अभियंत्यांनी (सोलर मामाज) दार-ए-सलाम येथे पंतप्रधानांसमोर कौशल्य प्रात्यक्षिके सादर केली

ग्रामीण महिला सौर अभियंत्यांनी (सोलर मामाज) दार-ए-सलाम येथे पंतप्रधानांसमोर कौशल्य प्रात्यक्षिके सादर केली


टांझानिया आणि अन्य काही आफ्रिकी देशांमधील सुमारे 30 सोलर मामाजच्या गटाने सौर कंदील आणि घरगुती प्रकाश व्यवस्थांच्या उत्पादन, दुरुस्ती आणि देखभाल यामधील त्यांचे कौशल्य आज पंतप्रधानांसमोर सादर केले. त्यांनी मध काढणे आणि शिलाई यामधील त्यांचे कौशल्य दाखवले आणि ‘वी शल ओव्हरकम’ हे गाणे म्हटले.

भारत सरकार पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत तिलोनिया (राजस्थान) येथील बेअरफूट महाविद्यालय, आफ्रिकेतील ग्रामीण महिला सौर अभियंत्यांना (सोलर मामाज) सौर कंदील आणि घरगुती सौर दिव्यांचे उत्पादन, दुरुस्ती आणि देखभाल यामधील प्रशिक्षण देत आहे. त्यांनी टांझानियामधील झांझिबार बेटांवर तसेच आफ्रिकेतील अन्य देशांमध्ये प्रशिक्षणार्थींना सौर विद्युत कौशल्य (प्रशिक्षण) देण्यासाठी आणि सोलर किट्स वितरित करण्यासाठी बेअर फूट महिला व्यावसायिक प्रशिक्षण महाविद्यालय उभारले आहे. या महाविद्यालयांमध्ये मधमाशी पालन, शिवणकाम वगैरे विविध उद्यमशील कौशल्यासाठी देखील सहाय्य पुरवले जाते. सोलर मामाजनी सौर दिव्यांचे उत्पादन केले आणि ते बसवले देखील, आता त्या त्यांच्या समाजामध्ये या सौर विद्युत व्यवस्थेची देखभाल करत आहेत.

S.Tupe/S.Kane