पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन औषधी दिन 2026 निमित्त, प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजनेचा सकारात्मक परिणाम होत असलेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक नागरिकाला परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार औषधे मिळावीत याप्रति आमची असलेली वचनबद्धता या उपक्रमातून दिसून येते असे ही मोदी यांनी म्हटले आहे. जन औषधी केंद्रांच्या माध्यमातून असंख्य कुटुंबे आरोग्यसेवेच्या खर्चात बचत करत आहेत आणि योग्य उपचार मिळवत आहेत, असेही मोदी पुढे नमूद केले.
या निमित्ताने पंतप्रधानांनी भारतीय जनऔषधी परियोजनेच्या परिवर्तनात्मक प्रभावाची झलकही सामायिक केली आहे.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे;
“#जन औषधीदिन 2026 निमित्ताने, प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेचा सकारात्मक परिणाम झालेल्या सर्वांना माझ्या शुभेच्छा. हा उपक्रम प्रत्येक नागरिकाला परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार औषधे उपलब्ध करून देण्याप्रति आमची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो. जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून, असंख्य कुटुंबे आपल्या आरोग्यसेवेच्या खर्चात बचत करत आहेत आणि योग्य उपचार मिळवत आहेत.”
On #JanAushadhiDiwas2026, my best wishes to all those who have been positively impacted by the Pradhan Mantri Bhartiya Janaushadhi Pariyojana. This initiative reflects our commitment to ensuring that every citizen has access to quality medicines at affordable prices. Through Jan… https://t.co/fgn7Of5M5S
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2026
“प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेच्या परिवर्तनात्मक प्रभावाची एक झलक.”
#JanAushadhiDiwas2026”
A glimpse of the transformative impact of Pradhan Mantri Bhartiya Janaushadhi Pariyojana. #JanAushadhiDiwas2026 https://t.co/1cjvpiTOQS
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2026
***
सुषमा काणे/संपदा पाटगावकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com