पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सानेए ताकाइची यांनी जपानच्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
जपान आणि भारत यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी वैश्विक शांतता, स्थैर्य आणि समृद्धी यामध्ये मोलाची भूमिका बजावते, असे पंतप्रधान म्हणाले.
सानेए ताकाइची यांच्या सक्षम नेतृत्वामुळे भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीसंबंध नवी उंची गाठतील, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे,
‘’पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल सानेए ताकाइची यांचे अभिनंदन!
आपल्या विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीमध्ये वैश्विक शांतता, स्थैर्य आणि समृद्धी यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे.
त्या जपानचे नेत़ृत्व करत असताना, भारत आणि जपान यांच्यातील मैत्री नव्या उंचीवर जाईल, असा मला विश्वास आहे.
@takaichi_sanae”
Congratulations Sanae Takaichi on your landmark victory in the elections to the House of Representatives!
Our Special Strategic and Global Partnership plays a vital role in enhancing…
— Narendra Modi (@narendramodi) February 8, 2026
***
सुवर्णा बेडेकर/ सुरेखा जोशी /परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com