Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त पंतप्रधानांचे ग्राहकांना अभिवादन, डिजिटल व्यवहारांना चालना देण्याचे आवाहन


जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त ग्राहकांना अभिवादन करत त्यांनी डिजिटल व्यवहारांना चालना द्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

“ग्राहक हक्क दिनानिमित्त आम्ही ग्राहकांना अभिवादन करतो. त्यांच्या क्रयशक्तीवर अर्थ व्यवस्थेचा विकास अवलंबून आहे.

ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार विविध उपक्रम राबवित असून, त्यांच्या तक्रार निवारणासाठीही सरकार प्रयत्नशील आहे.

या जागतिक ग्राहक हक्क संरक्षण दिनी ग्राहकांनी डिजिटल व्यवहारांना चालना द्यावी आणि भ्रष्टाचार तसेच काळा पैसा संपविण्यासाठीच्या चळवळीला हातभार लावावा.” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/M.Pange/D.Rane