Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जीसॅट-11 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


जीसॅट-11 या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे अभिनंदन केले आहे.

आपल्या अंतराळ कार्यक्रमातला महत्वाचा टप्पा, यामुळे दुर्गम भाग दूरसंवाद जाळ्याने जोडले जाऊन करोडो भारतीयांच्या जीवनात परिवर्तन घडेल. जीसॅट-11 या सर्वात अवजड, मोठ्या आणि अती प्रगत अशा या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे अभिनंदन.

कल्पक आणि यशस्वी कामगिरीसाठी नवनवी उद्दिष्टं ठेवणाऱ्या आमच्या शास्त्रज्ञांचा संपूर्ण भारताला अभिमान आहे. त्यांचे उल्लेखनीय कार्य प्रत्येक भारतीयाला स्फूर्तीदायी आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे.

N.Sapre/N.Chitale/P.Kor