Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जोगबनी-बिराटनगर येथे दुसऱ्या एकात्मिक तपास चौकीचे भारत आणि नेपाळचे पंतप्रधान संयुक्तरित्या करणार उद्‌घाटन


जोगबनी-बिराटनगर दुसऱ्या एकात्मिक तपास चौकीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांच्यासह उद्या उदघाटन करणार आहेत. भारत नेपाळ सरहद्दीवर व्यापार आणि नागरिकांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी भारताच्या साहाय्यातून ही चौकी बांधण्यात आली आहे.

नेपाळमध्ये भूकंपानंतर भारत सरकारच्या साहाय्यातून उभारण्यात आलेल्या घरे पुनर्बांधणी प्रकल्पातील उल्लेखनीय प्रगती दोन्ही पंतप्रधान पाहतील. गोरखा आणि नुवाकोट जिल्ह्यात 50,000 घरे बांधण्याचे वचन भारताने दिले होते. त्यापैकी 45,000 बांधून पूर्ण झाली आहेत.

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar