Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डीएव्ही कॉलेज मॅनेजिंग कमिटीने आयोजित केलेल्या “नई दिशा, नया संकल्प” कार्यक्रमात विद्यार्थी आणि शिक्षकांना पंतप्रधानांनी संबोधित केले

डीएव्ही कॉलेज मॅनेजिंग कमिटीने आयोजित केलेल्या “नई दिशा, नया संकल्प” कार्यक्रमात विद्यार्थी आणि शिक्षकांना  पंतप्रधानांनी संबोधित केले


दयानंद ॲग्लो वेदिक महाविद्यालय व्यवस्थापकीय समितीने आयोजित केलेल्या “नई दिशा, नया संकल्प” या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना संबोधित केले.

स्वामी दयानंद आजही प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितले. 1857 च्या स्वातंत्र्याच्या उठावाच्या पार्श्वभूमीवर आर्य समाजाची स्थापना झाली. आर्य समाजाने अंधश्रध्देविरोधात लढा दिला आणि सुधारणाचे ते शक्तीस्थानही बनले.

जागतिक स्तरावर भारताची उंची अधिक वाढविण्याचा नवा संकल्प असायला हवा असे पंतप्रधान म्हणाले. ही स्वामी दयानंदाना खरी श्रध्दांजली ठरेल असे त्यांनी सांगितले. डीएव्हीच्या विद्यार्थ्यांची मोठी क्षमता लक्षात घेता, त्यांनी एखाद्या विषयावर काम करण्याचा निर्धार केल्यास, अल्पावधीतच त्याचा ठळक परिणाम ते साध्य करु शकतील. 21व्या शतकाचा आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ भारत घडविण्याचा नेहमीच प्रयत्न असला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

गंगा नदी स्वच्छ करण्याचा “क्लीन गंगा” उपक्रमाला डीएव्ही कॉलेज मॅनेजमेंट कमिटीने पाठिंबा देऊ केल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचे स्वागत करत केवळ जनसहभागातूनच हा उपक्रम यशस्वी ठरु शकेल असे पंतप्रधान म्हणाले.

मुद्रा योजना, स्टार्ट अप इंडिया आणि कौशल्य विकास यासारख्या युवकांना लाभदायी ठरणाऱ्या सरकारच्या विविध उपक्रमांची माहितीही पंतप्रधानांनी दिली.

N.Chitale/I.Jhala/M.Desai