Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तामिळनाडू मधील तिरुचिरापल्ली येथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक.


पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून सानुग्रह अनुदान जाहीर.

तामिळनाडू मधील तिरुचिरापल्ली येथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या असून जखमी व्यक्ती लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून  प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली आहे.

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये लिहिले आहे:

तामिळनाडू मधील तिरुचिरापल्ली येथे झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत व्यथित झालो आहे. या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्यांच्या प्रति माझ्या संवेदना. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना करत आहे

या दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या निकटवर्तीयांना पीएमएनआरएफमधून 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान @narendramodi

***

NehaKulkarni / BhaktiSontakke / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai