Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ताश्कंदमधल्या एससीओ बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी घेतली चीनचे राष्ट्रपती शी झिनपिंग यांची भेट

ताश्कंदमधल्या एससीओ बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी  घेतली चीनचे  राष्ट्रपती शी झिनपिंग यांची भेट

ताश्कंदमधल्या एससीओ बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी  घेतली चीनचे  राष्ट्रपती शी झिनपिंग यांची भेट

ताश्कंदमध्ये आज शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी झिनपिंग यांची भेट घेतली. शांघाय सहकार्य संघटनेत भारताच्या प्रवेशाचे झिनपिंग यांनी स्वागत केले आणि संघटना बळकट होईल असे सांगितले. संघटनेत भारताच्या सदस्यत्वासाठी चीनने पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झिनपिंग यांचे आभार मानले. सेऊल येथे आयोजित अण्वस्त्र पुरवठादार गटाच्या बैठकीतबाबत ज्यामध्ये भारताच्या सदस्यत्वाबाबत चर्चा होणार आहे, त्याबाबतही पंतप्रधानांनी चर्चा केली. भारताच्या दाव्याचा चीनने न्याय्य दृष्टिकोनातून विचार करावा असे आवाहन पंतप्रधानांनी चीनला केले. सेऊलमध्ये एकमतासाठी चीनने योगदान द्यावे, असे पंतप्रधान म्हणाले.

S.Kulkarni/B.Gokhale