पीएम्इंडिया
2015-16 या शैक्षिणिक वर्षापासून प्रारंभीच्या 3 वर्षासाठी आंध्र प्रदेशमधे तिरुपती येथे नव्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे कार्यान्वयन करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजूरी देण्यात आली. त्या साठी 137.30 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, तात्पुरत्या परिसरातून त्याचे कामकाज चालणार आहे.
आंध्र प्रदेश पूनर्गठन अधिनियम 2014 च्या अनुषंगाने तत्कालीन राज्य तेलंगणा आणि आंध्र प्रदेश असे विभाजीत झाल्यामुळे भारत सरकारने भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था आंध्र प्रदेशमधे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने तिरुपती येथे 244 एकर जमीन आरक्षित केली आहे.
M.Pange / S. Tupe / M. Desai