Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तेल अवीव येथे आगमन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इस्रायलच्या पंतप्रधानांनी केले स्वागत


नवी दिल्‍ली, 25 फेब्रुवारी 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजकीय दौऱ्यासाठी इस्रायलला पोहोचले. तेल अवीव येथील विमानतळावर आगमन होताच, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नी  सारा नेतन्याहू यांनी  त्यांचे औपचारिक स्वागत केले.

स्वागत कार्यक्रमानंतर, उभय पंतप्रधानांनी अल्पकाळ व्यक्तिगत भेट घेतली. हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर, भारतीय समुदायाच्या सदस्यांनी आणि ज्यू भारतीय सदस्यांनी पंतप्रधानांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. दोन्ही राष्ट्रांमधील चिरस्थायी मैत्रीचे प्रतीक म्हणून; भारतीय आणि इस्रायली कलाकारांनी खूप उत्साहाने सांस्कृतिक सादरीकरणाने पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले.

 

* * *

सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai