Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला पेरसाद बिसेसर यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक मेजवानी कार्यक्रमात पंतप्रधान झाले सहभागी


त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला पेरसाद बिसेसर यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक मेजवानी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या या मेजवानीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या जनतेच्या दृष्टीने विशेष सांस्कृतिक महत्त्व असलेल्या सोहरीच्या पानात जेवण वाढण्यात आले. 

एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणालेः
” त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या मेजवानीच्या वेळी, त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या जनतेच्या दृष्टीने विशेषतः भारतीय मूळ असलेल्या जनतेसाठी विशेष सांस्कृतिक महत्त्व असलेल्या सोहरीच्या पानात जेवण वाढण्यात आले. या ठिकाणी उत्सव आणि इतर विशेष कार्यक्रमांच्या वेळी नेहमीच या पानांवर जेवण वाढण्यात येते. “

***

JPS/ShaileshP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai