Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दक्षिण आशियाई समुद्र क्षेत्रात तेल आणि रासायनिक प्रदूषणाविरोधात सहकार्यासाठी भारत आणि दक्षिण आशिया सहकारी पर्यावरण कार्यक्रम यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्री मंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री मंडळाने दक्षिण आशियाई समुद्र क्षेत्रात तेल आणि रासायनिक प्रदूषणाविरोधात सहकार्यासाठी भारत आणि दक्षिण आशिया सहकारी पर्यावरण कार्यक्रम यांच्यातील सामंजस्य करारावरील स्वाक्षरीला मंजुरी दिली आहे.

प्रभाव :

भारत आणि बांगलादेश, मालदीव , पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासारख्या दक्षिण आशियाई समुद्र क्षेत्रातील देशांदरम्यान या परिसरात सागरी पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी सहकार्य दृढ करण्याला प्रोत्साहन देणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.

अंमलबजावणी :

या करारांतर्गत भारतीय तटरक्षक दल (आयसीजी) सक्षम राष्ट्रीय प्राधिकरण असेल आणि “क्षेत्रीय तेल गळती आपत्कालीन योजना” लागू करण्यासाठी संचलनाच्या दृष्टीने संपर्क बिंदू असेल. तसेच सागरी दुर्घटनांसाठी आयसीजी सागरी बचाव समन्वय केंद्रे हे राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्र असेल.

पार्श्वभूमी :

दक्षिण आशियाई क्षेत्रात पर्यावरण संरक्षण, व्यवस्थापन आणि प्रोत्‍साहनाला समर्थन देण्यासाठी १९८२ मध्ये श्रीलंकेत अफगाणिस्‍तान, बांग्‍लादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाल आणि श्रीलंका सरकारांनी एसएसीईपीची स्थापना केली होती. एसएसीईपी ने इंटरनेशनल मेरीटाइम ऑर्गनाइजेशन (आईएमओ) सह संयुक्‍तरित्या ‘क्षेत्रीय तेल गळती आपत्कालीन योजना’ विकसित केली जेणेकरून बांग्‍लादेश, भारत, मालदीव, पाकिस्‍तान आणि श्रीलंकेच्या समुद्रात तेल प्रदूषणाच्या मोठ्या घटनांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि परस्पर सहकार्य याबाबत तयारी करता येईल.

N.Sapre/S.Kane/P.Malandkar