Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दलित आदिवासी आणि महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या स्टॅन्ड अप इंडिया उपक्रमाचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

दलित आदिवासी आणि महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या  स्टॅन्ड अप इंडिया उपक्रमाचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

दलित आदिवासी आणि महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या  स्टॅन्ड अप इंडिया उपक्रमाचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्टॅन्ड अप इंडिया उपक्रमाचा शुभारंभ केला. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला उद्योजकतेला चालना मिळावी हा यामागचा हेतू आहे. या प्रवर्गातल्या किमान दोन उद्योजकांना कर्ज देण्याची संकल्पना या उपक्रमात आहे. दहा लाख ते एक कोटी रुपयापर्यंत कर्ज देता येणार आहे. 5100 ई-रिक्शाचेही यावेळी वितरण करण्यात आले.

पंतप्रधानांनी, बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली. देशात अत्यंत महत्त्वाच्या काळात, विविध महत्त्वाच्या पदांवर राहून त्यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाचे स्मरण पंतप्रधानांनी केले.

स्टॅन्ड अप इंडिया उपक्रमामुळे दलित आणि आदिवासींच्या जीवनात मोठा बदल घडेल असा विश्वास व्यक्त करतानाच रोजगार मिळवणारे याऐवजी रोजगार निर्माण करणारे असा बदल आपल्याला घडवायचा असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

गोरगरिबांच्या सहभागानेच भारताची विकासाची वाटचाल दृढ होईल. मुलांना विशेषत: बालिकांना शिक्षण देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी उपस्थितांना केले.

याआधी पंतप्रधानांनी, लाभार्थीच्या कुटुंबासमवेत चहापान करताना संवादही साधला. ई-रिक्शामुळे आपल्‍या जीवनात सकारात्मक बदल कसा घडेल हे या लाभार्थीनी पंतप्रधानांना सांगितले.या लाभार्थीनी आपल्या मुलांना शिक्षण मिळण्याची खातरजमा करावी असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधानांनी एक ई-रिक्शा आरक्षित करुन मंचाच्या दिशेने ई-रिक्शातून फेरीही मारली, या फेरीचे पैसे त्यांनी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून दिले.

N.Chitale/S.Tupe/M.Desai