पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीचे पोलिस आयुक्त बी.एस बस्सी यांना बोलावून राजधानीतल्या गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणाबद्दल चिंता व्यक्त केली. नुकत्याच झालेल्या नुकसानकारक घटनांची जलदगतीने चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी पोलिस आयुक्तांना केले.
केंद्रीय गृहसचिव एल. सी. गोयल यांच्याशीही पंतप्रधानांनी दूरध्वनीवरुन चर्चा केली. राजधानीतल्या वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष देऊन महिला सुरक्षिततेची खातरजमा करावी असे पंतप्रधानांनी गृहसचिवांना सांगितले आहे.