Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दिल्लीतील विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभाची क्षणचित्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली सामायिक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभाची काही क्षणचित्रे सामायिक केली आहेत.

X या समाज माध्यमावरील संदेशाच्या मालिकेत त्यांनी म्हटले आहे:

“दिल्लीतील सरोजिनी नगर येथील जीपीआरए (GPRA) क्वार्टर्समध्ये महिला लाभार्थींना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्या सुपूर्द करताना मला अत्यंत आनंद झाला. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक सुविधांनी युक्त ही घरे उभारणे हे पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत आमच्या वचनबद्धतेचे प्रभावी उदाहरण आहे.”

“आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने जीपीआरए क्वार्टर्सच्या बांधकामात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आपल्या नारीशक्तीशी संवाद साधून मला नव्या ऊर्जेची अनुभूती झाली.”

“आज मला दिल्ली मेट्रो संबंधित एका प्रदर्शनाला भेट देण्याची संधी मिळाली. वेगाने विस्तारत असलेली मेट्रो रेल दिल्लीतील नागरिकांचे जीवन अधिक सुलभ आणि सोयीस्कर कसे बनवत आहे, हे या प्रदर्शनातून जाणून घेता आले.”

“आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपल्या माता-भगिनी आणि मुलींशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या वेळी नारीशक्तीचा आत्मविश्वास पाहून मला अभिमान वाटला.”

“आज नवी दिल्ली येथे नारीशक्तीला आयुष्मान भारत कार्ड आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत स्वनिधी क्रेडिट कार्ड देण्याचा मला सन्मान मिळाला. त्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

विकासाबाबत दिल्लीतील माझ्या कुटुंबियांचा चैतन्य आणि उत्साह पाहून मी भारावून गेलो आहे.

दिल्लीचा विकास हा संपूर्ण देशाच्या प्रतिमेशी जोडलेला असल्याने येथे मेट्रो सुविधांसह पायाभूत सुविधांचा वेगाने होत असलेला विस्तार पाहून मला खूप आनंद होत आहे.

‘आप’दा वाल्यांची पद्धत काम कमी आणि बहाणे जास्त, अशी होती. मात्र आज दिल्लीमध्ये विकासाचे मॉडेल आहे. बहाणे बंद आणि काम सुरू. 

आमच्या सरकारने हातगाडी-टपऱ्यांवर व्यवसाय करणाऱ्या बांधवांसाठी स्वनिधी क्रेडिट कार्ड अभियान सुरू केले असून हे कार्ड गरीबांच्या स्वाभिमानाचे नवे माध्यम ठरत आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज मी अभिमानाने सांगतो की, देशाने 3 कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचा जो संकल्प केला होता तो पूर्ण झाला आहे आणि आता आणखी 3 कोटी दीदींना लखपती दीदी करण्याचा संकल्प आम्ही करत आहोत.
आज देश आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत असताना काल पश्चिम बंगालमध्ये टीएमसी सरकारने देशाच्या राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मू यांचा घोर अपमान केला; त्यांच्या कार्यक्रमाची अत्यंत वाईट व्यवस्था करण्यात आली. पश्चिम बंगालमधील सुजाण जनता एका महिलेचा, एका आदिवासीचा आणि देशाच्या महामहिम राष्ट्रपतींचा झालेला हा अपमान टीएमसीला कधीही माफ करणार नाही.

***

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/राज दळेकर/परशुराम कोर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]

Goa

Follow us on social media: PM India@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji   PM India /pibpanaji  PM Indiapibgoa@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBPanaji   PM India /pibpanaji