पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्लीत राज्य अतिथी गृह बांधायला मध्य प्रदेश सरकारला १.४७८ एकर भूखंड वितरित करायला मंजुरी दिली आहे. बाजारभावानुसार पुढील अटींवर हि मंजुरी देण्यात आली आहे:
१. राज्य अतिथी गृह बांधून झाल्यावर ०.८९ भूखंड मध्य प्रदेश सरकार परत करेल.
२. बाजारभावानुसार मध्य प्रदेश सरकार भूखंडातील फरकाची रक्कम अदा करेल.
३. मध्य प्रदेश सरकार ०.८९ भूखंडावरील भोगवटा शुल्क सध्याच्या दरानुसार भरेल.
या भूखंड वितरणामुळे मध्य प्रदेश सरकारला सध्याच्या आणि भविष्यातील गरजांनुसार राज्य अतिथी गृह बांधता येईल. अन्य कुठल्याही प्रकारच्या बांधकामासाठी हा भूखंड वापरता येणार नाही.
N.Sapre/S.Kane/P.Kor