Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दीपगृह आणि दीपनौका महासंचालनालय आणि जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट लिमिटेड, महाराष्ट्र यांच्यात विखुरलेल्या भूखंडाची अदलाबदल


दीपगृह आणि दीपनौका महासंचालनालय(डीजीएलएल) आणि महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगड दीपगृहावरच्या मेसर्स जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट लिमिटेड यांच्यात विखुरलेल्या भूखंडाची अदलाबदल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. जमिनीची ही देवाणघेवाण डीजीएलएल आणि जेएसडब्ल्यू-जेपीएल साठी विना व्यत्यय विकास आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपयुक्त ठरणार आहे.

दीपगृह आणि दीपनौका महासंचालनलय एकूण 0.7630 हेक्टरचे जमिनीचे 12 तुकडे देणार असून त्याऐवजी एकूण 1 हेक्टरचे तीन तुकडे या महासंचालनालयाला मिळणार आहेत.

पार्श्वभूमी :-

दीपगृह महासंचालनालयाच्या विखुरलेल्या तुकड्यांमुळे जयगड पोर्ट लिमिटेडला त्यांच्या कार्यकृतीत अडथळा येत होता तसंच यामुळे इंटरनॅशनलशिप ॲण्ड पोर्ट फॅसिलीटी सिक्युरिटी (आयएसपीएस)बाबत पूर्तता करण्यातही अडचणी येत होत्‍या. डीजीएलएललाही विखुरलेल्या भूखंडामुळे द्विपगृह विस्तारात अडथळे निर्माण होत होते. या भूखंड अदलाबदलीचा डिजिएलएल आणि जेएसडब्ल्यू-जेपीएल या दोघांनाही फायदा होणार आहे.

N. Chitale/S.Tupe/N.Sapre