Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

देशभरात साजऱ्या होत असलेल्या विविध सणांनिमित्त पंतप्रधानांच्या नागरिकांना शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात साजऱ्या होत असलेल्या विविध सणांनिमित्त नागरिकांना ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. हे सण आपल्या जीवनात आनंद आणि सुखसमृध्दी वृध्दिंगत करोत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

“देशभरात विविध सण साजरे होत आहेत. नागरिकांना माझ्याकडून शुभेच्छा. हे सण आपल्या आयुष्यात आनंद आणि समृध्दी वृध्दिंगत करोत.

गुजरातमधल्या जनतेला उत्तरायणाच्या शुभेच्छा.

माघ बिहूच्या आसाममधल्या जनतेला शुभेच्छा.

सर्वांना भोगीच्या शुभेच्छा. हा दिवस सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो.

तामीळनाडूतल्या जनतेला पोंगलच्या हार्दिक शुभेच्छा.

“सर्व देशवासीयांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.