Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

देशाच्या युवा पिढीने एकत्र येऊन भारतासाठी काम करावे असे पंतप्रधानांचे आवाहन


 

अपशब्दांचा वापर करून कोणतीही समस्या सुटत नसून, दिशाभूल झालेल्यांना मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

जंतर-मंतर येथील घटनेचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, स्वतः त्यांच्याविरुद्ध आणि त्यांच्या दिवंगत माते विरोधातही अपमानास्पद भाषेचा वापर केल्याचे देशाने आणि जगाने पाहिले. ते म्हणाले की, अशा वर्तनाबद्दल समाजात निर्माण झालेला रोष समजण्यासारखा असला, तरी बालपण हा असा काळ असतो जेव्हा चुका घडतात आणि त्यातून शिकण्याची आणि  स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधीही असते.

पंतप्रधान म्हणाले की, अशा भरकटलेल्या मुलांना शिक्षा करण्याऐवजी, त्यांना न्यायालयाच्या फेऱ्या मारायला लावण्याऐवजी किंवा सामाजिक छळाला सामोरे जायला भाग पाडण्याऐवजी, आपण त्यांना आपलंसं केलं पाहिजे आणि योग्य मार्ग दाखवला पाहिजे. आपल्याला या मुलांना माफ करायचे आहे, असे सांगून, समाजानेही आपली ही भावना समजून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

पंतप्रधानांनी तरुणांना राष्ट्रासाठी एकत्र पुढे जाण्याचे, चुकांमधून शिकण्याचे आणि त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचे आवाहन केले. देश झपाट्याने प्रगती करत आहे असे सांगून प्रत्येक तरुणाने आयुष्यात पुढे जावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

भारतासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन मोदी यांनी केले आहे.

तरुणांना योग्य मार्ग निवडण्याचे आवाहन करणारा एक व्हिडिओ शेअर करताना मोदी म्हणाले,

“अपशब्द वापरून कोणतीही समस्या सुटत नाही.

दिशाभूल झालेल्यांना योग्य मार्ग दाखवूया.

एकत्रितपणे काम करूया.

भारतासाठी काम करूया.”

***

यश राणे / राजश्री आगाशेपरशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai