Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी मानले आभार


नवी दिल्ली,17 सप्टेंबर 2026

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेल्या स्नेहपूर्ण वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले आहेत. एक प्रगत, समृद्ध, आत्मनिर्भर आणि विकसित भारत घडवण्याच्या संकल्पासह देश नवीन ऊर्जा आणि अधिक वेगाने सातत्याने पुढे जात आहे. राष्ट्रनिर्मितीच्या या प्रवासात माननीय राष्ट्रपतींचे मार्गदर्शन आणि प्रेरणा अमूल्य आहेत आणि त्या जनसेवेच्या प्रयत्नांना अधिक बळ देतात, असे मोदी यांनी म्हटले आहे.

मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिले आहे की,

माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, आपल्या मनःपूर्वक शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. एक प्रगतीशील, समृद्ध, आत्मनिर्भर आणि विकसित भारत घडवण्याच्या दृढनिश्चयाने, आम्ही नव्या उर्जेने आणि गतीने पुढे वाटचाल करत आहोत.

राष्ट्रउभारणीच्या या प्रवासात आपले मार्गदर्शन आणि प्रेरणा आमच्यासाठी अनमोल आहेत. त्यामुळे लोकांची सेवा करण्याच्या आमच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळते. भारताचा समृद्ध वारसा आणि आधुनिक विकास यांचा संगम, तसेच जनसहभागाच्या जोरावर, देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

राधिका अघोर/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai